30.7 C
Solapur
September 28, 2023
उस्मानाबाद  तुळजापूर

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धनादेश वाटप.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा

गेल्या काही महिन्यांपूर्वी धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी अनेक प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते, सन्माननीय मुख्यमंत्री, ना. मंत्रिमंडळ यांचे पाहणी दौरे झाले होते.

यामध्ये काल तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथे ज्या शेतकऱ्यांची जनावरे अतिवृष्टीमध्ये वाहून गेली अथवा दगावली अशा दोन शेतकऱ्यांना तुळजापूर चे नायब तहसीलदार C. V. शिंदे साहेब तसेच तलाठी L. L. इप्पर साहेब यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. लाभार्थी शेतकरी तानाजी हाके व शिवाजी सोनवणे या शेतकऱ्यांना हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

यावेळी अपसिंगा ग्रा. पं. सदस्य अमिरभाई शेख, युवासेनेचे मा. उपतालुकाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, तानाजी हाके, शिवाजी सोनवणे, पप्पू नकाते, तात्यासाहेब हाके उपस्थित होते.

Related posts