साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.
धाराशिव (उस्मानाबाद) – धाराशिव (उस्मानाबाद) शिवसेना पक्षाकडे उपलब्ध असलेली रुग्णवाहिका धाराशिव चे खा. ओमराजे निंबाळकर व जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास पाटील यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयास सुपूर्द केली.
रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालयास सुपूर्द करतेवेळी खा. ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील कोरोना संक्रमित रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून उस्मानाबाद येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातही सद्यपरिस्थितीत बेड अपुरे पडत आहेत. सामान्य रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः उपचार आणि दवाखान्यापर्यंत पोहोचनेही अनेकांना अशक्य होते. रुग्णांची वेळेवर ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिकांची संख्या कमी आहे. रुग्णांची गरज ओळखून त्यांना वेळेवर उपचार उपलब्ध होण्यासाठी विविध सुविधांची गरज आहे. त्यात प्रामुख्याने रुग्णवाहिकांची उपलब्धता महत्वाची आहे. रुग्णांची ही गैरसोय दूर व्हावी, या अनुषंगाने धाराशिव (उस्मानाबाद) शिवसेना पक्षाकडे उपलब्ध असलेली रुग्णवाहिका तात्पुरत्या स्वरूपात धाराशिव लोकसभेचे लोकप्रिय खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास घाडगे-पाटील यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयास सुपूर्द करण्यात आली.
याप्रसंगी खा. ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी आदी उपस्थित होते.