कविता 

सरणावरती—–

या सरणावरती उठतात
भड़कत्या ज्वाला,
आपलेच इष्ट,मित्र
आपल्याच समोर
जळताना दुरुनच

पाहतात प्रेताला!
अख्खे कुटुंबच्या कुटुम्ब
झोपतात सरणावरती
काळझोप ती का!
मने कापतात तलवारिसारखे!
पाहुन त्या सरणावरती!!
मग कशाला एवढा मोठा

धोका,ओढून घ्यायचा
आपल्या अंगावर,आतातरी
उघड़ा डोळे, सोडून द्या
अडानिपण,बेफिकिरी सोडा
कोरोणा टाळा!म्हणून
सावध व्हायला हवं
सरणावरती जाण्यां अगोदर
जाग व्हायला हवं।

कवि
श्री देवीदास पांचाळ सर श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद।

Related posts