21.9 C
Solapur
February 22, 2024
महाराष्ट्र

नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये गळती

नाशिक : राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना, नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय हे नाशिक महापालिकेचं रुग्णालय आहे. दुरुस्ती करण्यासाठी रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल आहे. परिणामी रुग्णालयातील ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णाच्या जीव टांगणीला लागला आहे.
या रुग्णालयात ऑक्सिजनवर 131 रुग्ण आहेत. तर अत्यवस्थ रुग्ण 15 व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांना इतर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. 13 KL क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक होता. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो सर्वत्र पसरला आहे. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला आहे.

Related posts