पुरुषोत्तम विष्णु बेले
उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी
तुळजापूर – जवळगा मे. गावचे युवा नेते दिपक भैय्या लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळगा मे. येथे दिपक भैय्या लोखंडे मित्रपरिवाराच्या वतीने गावातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.
एका साधारण कुटुंबात जन्म घेऊन सुद्धा दिपक भैय्या यांना समजसेवेची मोठी आवड आहे. गावातील लहान थोर माणसांच्या मदतीला धाऊन येने हा त्यांचा स्वभाव आहे. हॅलो मेडिकल तसेच विविध सामजिक संस्था यांच्या माध्यमातून ते गावातील लोकांच्या युवकांच्या अडीअडचणीला ते मदत करत असतात.
या सर्व समाजपयोगी कामात त्यांची साथ देणारा त्यांचा मित्रपरिवार फार मोठा आहे, आज त्यांच्या वाढदिवसािमित्त शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यासाठी नागनाथ नरवडे, नरहरी लोखंडे, नागेश लोखंडे, अमोल जेटीथोर, विशाल लोमटे, संदीप लोखंडे, विनोद लोखंडे, संदीप नरवडे, अंकित उकरंडे, संभाजी मोहीते,मनोज मोहिते, शंकर लोखंडे, अक्षय मुर्टे, अझहर तांबोळी, प्रशांत कुलकर्णी, आदींसह जी. प. प्रा. शाळेचे मुख्याध्यापक वट्टे सर, सगर सर, ठोंबरे सर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते, दिपक भैय्या लोखंडे मित्रपरिवाराच्या वतीने केलेल्या कामाचे पण पंचक्रोशित कौतुक होत आहे..