साईनाथ जगन्नाथ गवळी
तुळजापूर/उस्मानाबाद(धाराशिव)
प्रतिनिधी.
जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे महावितरण च्या बाबतीत असलेल्या तक्रारी व त्यावरती करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने खासदार श्री.ओमप्रकाश राजेनिंबाळकर याच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या झालेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत उस्मानाबाद-कळंब यासह इतर अनेक ठिकाणी असलेल्या तांत्रिक बाबी तात्काळ सोडविण्याच्या सुचना केल्या खा. मा. ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या.
यावर्षी पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी बांधवांनी रब्बीच्या पिकांना पाणी देण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे विजेचा वापर वाढला असल्याने ट्रान्सफॉर्मर, सबस्टेशन वरती अतिरिक्त भार पडत असल्याने वीज ट्रिप होणे तसेच ट्रान्सफॉर्मर जळणे याकडे लक्ष देऊन सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी प्राधान्य द्यावे अशा सूचना यावेळी संबंधित यंत्रणेला करण्यात आल्या.
याव्यतिरिक्त ट्रान्सफॉर्मर च्या बाबतीत शेतकरी बांधवाकडून येत असलेल्या तक्रारी तसेच नविन कनेक्शन च्या बाबतीतील अडचणी वेळेवर सोडवाव्यात अशा सूचना उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना करण्यात आल्या.
याप्रसंगी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, धारशिवचे खासदार मा. ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, लातुर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री.कांबळे, उस्मानाबाद चे अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील, कार्यकारी अभियंता श्री.वाघमारे तसेच सर्व वरिष्ठ, कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.