साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक – मराठवाडा
धाराशिव – दि 05 डिसेंबर 2022 रोजी धाराशिव जिल्ह्यातील महत्वपूर्ण अशी सुधारित विद्युत वितरण प्रणाली ची (RDSS) बैठक खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष नंदूभैय्या राजेनिंबाळकर व जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत पार पडली.
या बैठकीत प्रामुख्याने शेतकऱ्याकडून होणारी सक्तीची वीज वसुली व विजेची होणारी चोरी तसेच ती रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तसेच प्रस्तावित नविन सबस्टेशन, जुने फीडर बदलणे, सध्या कार्यरत असणाऱ्या सब स्टेशन वरील अतिरिक्त पावर ट्रांसफार्मर बसवणे, ऍडिशनल फीडर करणे, नवीन वस्ती वाढीमध्ये लाईटची सुविधा नागरिकांना देणे यासह विजेच्या अनेक प्रश्नांवर तपशीलवार चर्चा झाली.
सदरील बैठकीमध्ये धाराशिव विभागातील 12 नविन 33/11 KV चे सबस्टेशन व तुळजापूर विभागातील 17 नविन 33/11 KV चे सबस्टेशन असे एकुण 29 नविन सबस्टेशन चा समावेश आहे.
*धाराशिव विभागात होणारे नविन सबस्टेशन
1. ताकमोडवाडी 2. पळसप 3. नळी वडगाव 4. जवळा (कळंब) 5. नायगाव 6. खानापूर 7. वंजारवाडी 8. बोडका 9. रोहकल 10. खासापुरी 11. गिरवली फाटा 12 चिखली- दारफळ
*तुळजापूर विभागात होणारे नविन सबस्टेशन
1. सुपतगाव/ सालेगाव 2. खेड 3. पिंपळा देवकुरुळी 4. कारला खंडाळा 5. ढेकरी 6. कुन्हाळी 7. दापका 8. नाईक चाकूर 9. हिप्परगा रवा 10. नंदगाव 11. वडगाव काटी 12. कोरेगाव वाडी 13. कराळीपाटी 14. तुगाव (उमरगा) 15. तामलवाडी इंडस्ट्रियल एरिया 16. उमरगा 17. वडगाव गांजा
* सध्या कार्यरत असलेल्या सबस्टेशनवर 20 अतिरिक्त पावर ट्रांसफार्मर 5 MVA चे बसवण्यात येणार आहेत ते खालीलप्रमाणे
1. डोंजा 2. पाचपिंपळा 3. येसवंडी 4. भोगजी 5. लोहटा 6. टाकळी ढोकी 7. ढगपिंपरी 8. मंगरूळ (कळंब) 9. केशेगाव (धाराशिव) 10. ढोकी
11. तावशी गड 12. आलुर 13. काटी 14. तामलवाडी 15. होर्टी 16. जेवळी 17. मंगरूळ (तुळजापूर) 18. बारुळ 19. तुळजापूर शहर 20. माडज
या बैठकीस धाराशिव अधीक्षक अभियंता पाटील, कार्यकारी अभियंता वाघमारे, कार्यकारी अभियंता गुजराती तसेच जिल्ह्यातील सर्व उपअभियंता उपस्थित होते.