कारखानदाऱ्यांनी शेतकऱ्यांचे अंत पाहू नये
अक्कलकोट प्रतिनिधी,
जिल्ह्यातील साखर कारखाण्याचे बॉयलर पेटून दोन महिने उलटले गेले तरी साखर कारखानदारऱ्यांनी ऊस दराचा पहिला हप्ता जाहीर केलेला नाही. पडलेल्या साखर दराचे कारण पुढे करून हंगाम सुरू केले आहे. जिल्हयासह तालुक्यातील एकही साखर कारखानदार पहिला हप्ता जाहीर करण्यास तयार नाही. कारखानदाऱ्यांनी शेतकऱ्यांचे अंत न पहाता एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात रक्कम जमा करण्यात यावा अशी मागणी अक्कलकोट पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश हिप्परगी यांनी केली आहे.
सोलापुर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्या प्रमाणे १५ तारखेच्या आत सोलापुर जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनी एफआरपी प्रमाणे २१ ते २३ प्रमाणे पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश असतांना देखील एकही कारखानदार तयार झाले नाही. बॉयलर पेटवुन दीड – दोन महिने उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या खात्यात एक दमडा देखील अजून दिलेला नाही. शेतकऱ्यांना वाली कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेतकरी वर्ग मोठया अडचणीत व संकटात सापडले आहे. साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता लवकरात लवकर एफआरपीप्रमाणे दर द्यावा. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. दत्तात्रय भरणे यांनी या विषयाकडे लक्ष घालून जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात सहकार्य करावे, अक्कलकोट तालुक्यासाठी एकमेव असलेले सिद्धेश्वर सहकारी कारखाना, जयहिंद शुगर, गोकुळ माऊली तडवळ, मातोश्री, गोकुळ शुगर धोत्री, हे सर्व कारखानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करून एफआरपीप्रमाणे दर तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा.
कारखानदाऱ्यांनी शेतकर्याचे अंत पाहू नये, शेतकऱ्यांनी जर त्यांचा हिसका एकदा दाखवला तर कारखाने बंद पडतील. त्यांच्या संयमाचा उद्रेक होईल. त्या साठी एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ रक्कम जमा करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे असे पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश हिप्पारगी यांनी यावेळी बोलताना सांगितले.