प्रतिनिधी : सलमान मुल्ला कळंब तालुक्यातील शेतकर्यांचे बियाणे 80 ते 90 % सोयाबीन बियाणे पेरलेले उगवले नसल्याने व अगोदरच दुष्काळ. बॅंका कर्ज देत नाहीत. कोरोनाचं लॉक डावुन या संकटामुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे .त्यामुळे शेतकर्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे तरी शेतकर्यांचे झालेले नुकसान त्वरित पंचनामे करून 15 दिवसांच्या आत शेतकर्यांच्या खात्यावर शेतकर्यांची नुकसान भरपाई जमा करावी.
अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे कळंब येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय यांना देण्यात आले असून या मागण्या मान्य न झाल्यास 13 जुलै रोजी मनसेच्या वतीने कुठल्याही ठिकाणी कोणत्याही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.यावेळी मनसेचे उस्मानाबाद जिल्हा संघटक अमरराजे कदम परमेश्वर.जिल्हाअध्यक्ष आबासाहेब ढवळे. माजी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कोठावळे. शेतकरी सेनेचे उपजिअध्यक्ष प्रभाकर धुमाळ. तालुका सचिव अशोक दशवंत. जलालभाई शेख. बापु क्षीरसागर. सलीम औटी आदी उपस्थित होते.