जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
कळंब – पेट्रोल, डिझेल आणि घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने त्याच्या निषेधार्थ आज शिवसैनिकांनी कळंब तालुक्यामध्ये समोर व पंचायत समिती पासून ते तहसील कार्यालया पर्यंत गाड्या ढकलत नेहून जोरदार आंदोलन केलं.
‘रद्द करा रद्द करा, इंधन दरवाढ रद्द करा’, ‘या सरकारचं करायचं काय? अशी घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी संपूर्ण तहसील परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
.
यांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढ बाबत कळंब शिवसेना तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी कापसे,शहर प्रमुख प्रदीप मेटे युवा सेनेचे सागर बराते,गोविंद चौधरी, अँड.मंदार मुळीक,श्याम खबाले, दिनकर काळे, बबन जावळे, प.स.सदस्य राम हरी मुंडे,राजेश्वर पाटील,युवा सेना चे तालुका अध्यक्ष मनो धोंगडे.कृष्णा हुरगट,तानाजी कापसे,रामेश्वर जमाले, चोंदे, बबलू चोंदे.नगरसेवक अनंत वाघमारे,सतीश टोणगे, अजित गुरव आदी उपस्थित होते…