साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक – मराठवाडा
महाराष्ट्र सरकारने बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती दरवर्षी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरवात करणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर यांचा आज जन्मदिवस आहे. 16 फेब्रुवारी 1812 ला कोकणात एका सामान्य घरात जन्माला आलेल्या बाळशास्त्री यांचे जीवनमान अवघ्या 34 वर्षांचे होते. पण त्यांच्या विचारांचा ठेवा, कार्याची पद्धत आणि समाजात प्रबोधन घडवून आणण्यात मोलाचा वाटा आहे.
तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य श्री घोडके व्ही.बी. यांच्या हस्ते करण्यात आले. सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री स्वामी रमाकांत सर यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
यानिमित्त इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी वर्ग पत्रिका तयार केली, त्यांना श्री स्वामी सरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी , पर्यवेक्षक, तसेच वसतिगृह अधिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.