साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा.
कळंब दि. 10 (प्रतिनिधी) : कळंब तालुक्यातील वाकडी (केज) येथील ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्यांसह गावातील शेकडो युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे- पाटील यांनी पक्षात स्वागत केले.
वाकडी (केज) या गावातील विविध विकासकामांसाठी आमदार कैलास घाडगे- पाटील यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून व विविध योजनांतून ८० लाखांपेक्षा अधिक रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. गावाच्या विकासासाठी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे या गावच्या सरपंच परिमाळाताई कुरुंद, उपरसपंच तुकाराम कुरुंद यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व गावातील शेकडो युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. एका कार्यक्रमात हा पक्षप्रवेशाचा सोहळा झाला. या सर्वांचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे -पाटील यांनी पक्षात स्वागत केले.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, कळंब शहरप्रमुख प्रदीप मेटे, उपतालुकाप्रमुख भारत सांगळे, विधानसभा मतदारसंघप्रमुख सचिन काळे, युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख सागर बाराते, अॅड. मंदार मुळीक, हावरगावचे सरपंच चक्रधर कोल्हे, वाकडीचे (केज) शाखाप्रमुख बालाजी कोल्हे, बंडू यादव, आडसूळवाडीचे सरपंच चंद्रसेन आडसूळ, शिवहार स्वामी, बापू रणदिवे, रामेश्वर जमाले, प्रेम मडके, विजय कुरुंद आदी उपस्थित होते.
यावेळी गावात शिवसेनेच्या दोन शाखाचे उदघाटनही करण्यात आले. शाखाध्यक्षपदी मधुकर कुरुंद, उपाध्यक्षपदी सुरेश यादव, कोषाध्यक्षपदी बळीराम कुरुंद यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी दिगंबर कोल्हे भारत कोल्हे, गणेश फाटे, विशाल कोल्हे, बालाजी कोल्हे, हनुमंत कोल्हे, बालाजी कुरुंद, उमाकाल लंगडे, परमेश्वर कोल्हे, उमेश यादव, विकास कुरुंद, शामराव कोल्हे, सूरज कोल्हे, धनंजय कुरुंद, विष्णु कुरुंद, अमोल वाघमारे, आनंद रणदिवे, अविनाश रणदिवे, सचिन रणदिवे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.