साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.
ग्रामीण पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन नुकतेच शिर्डी येथे पार पडला. या कार्यक्रमाला धुमस चिञपटाचे अभिनेते रोहन जाधव, टिक टाॕक स्टार गोलिगत यांच्या सह धुमस चिञपटाचे निर्माते डी गोवर्धन कळंबी, चिञपटाचे निर्माते दिलीप वाकचौरे, ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय खेमनर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती व्यासपीठावर होती.
ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जाहीर झालेल्या
विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार यावेळी देण्यात आले. यामध्ये तुळजापूर येथील पत्रकार तथा वृत्तनिवेदिका कु.किरण चौधरी यांना उत्कृष्ट वृत्तनिवेदिका म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रदेश अध्यक्ष जयेश सावंत, प्रदेश उपाध्यक्ष किरण शिंदे, राजेंद्र उंडे, संतोष बोरुडे, विठ्ठल गोरणे, प्रकाश साळवे, संदीप आसणे, जालिंदर रोडे, हनुमंत शेजवळ, सागर पवार, अविनाश येळवंडे, अमर सय्यद, राजेश बोरुडे, संदीप कायगुडे, बाळासाहेब शिंदे, नानासाहेब शिंदे, संजय महाजन, साईप्रसाद कुंभकर्ण, प्रवीण जमदाडे, सविता कुलकर्णी, जयश्री काळे, देवा साळुंके, भैय्या खिल्लारे आदींसह महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.