जिल्हा प्रतिनिधी सलमान मुल्ला
आज दि. 30/11/2020 कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना, महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मार्गदर्शक मा. जयदीप दादा ननावरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुष्ठाधाम उस्मानाबाद येथील रुग्णांना ब्लँकेट, अल्पोपहार (केळी, सफरचंद, बिस्किट) वाटप करत रुग्णांन समवेत केक कपात वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थापक सदस्य निखिल पडवळ, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष धवलसिंह लावंड, विद्यार्थी सेल जिल्हाध्यक्ष सुशांत क्षीरसागर, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष हरीष देशमुख, तालुका उपाध्यक्ष महेश गरड, विद्यार्थी सेल जिल्हा कार्याध्यक्ष चैतन्य सुपेकर, शहराध्यक्ष निखिल शिंदे तसेच संभाजी भोईटे, राकेश सूर्यवंशी, हर्षल डोके आदी मित्र परिवार आणि कृषी बांधव उपस्थित होते.