अक्कलकोट

दुधनी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल युवा नेते प्रथमेश म्हेत्रे यांचा सत्कार.

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट पंचायत समितीमध्ये दुधनी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी युवा नेते प्रथमेश म्हेत्रे यांची निवड झाल्याबद्दल शुक्रवारी सत्कार करण्यात आला.

 अक्कलकोट पंचायत समिती  सभापती सुनंदा गायकवाड ,उपसभापती प्रकाश हिप्परगी  यांच्या हस्ते प्रथमेश म्हेत्रेचां सत्कार करण्यात आला .याप्रसंगी पंचायत समिती सदस्य विलासराव गव्हाणे, माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड ,पंचायत समिती सदस्य  अनिता ननवरे, दुधनी चे नगरसेवक डॉक्टर उदय म्हत्रे , पत्रकार राजेश जगताप, रमेश भंडारी , स्वामिराव गायकवाड , ,इब्राहिमपूर शरणगौडा पाटील, दत्ता सावळे, दयानंद परिचारक ,रोहिदास राठोड ,मल्लिनाथ कलशेट्टी आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी  युवा नेते प्रथमेश म्हेत्रे यांनी जनतेच्या सेवेसाठी पुढील काळात काम करणार असून तरुणाचीं फळी उभी करण्यावर भर देणार असे प्रतिपादन केले.पंचायत समिती सभापती सुनंदा गायकवाड यांनी युवा नेते प्रथमेश म्हेत्रे यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related posts