अक्कलकोट

संदीप जाधव यांची श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र मंडळाला भेट

अक्कलकोट त् प्रतिनिधी )
मातोश्री ग्रुप ऑफ कंपनीचे मालक आणि शिवसेना संपर्क प्रमुख महाड विधानसभा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासु संदीप जाधव यांची श्री स्वामी समर्थ मंदिराला व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचला सदिच्छा भेट दिली यावेळी देवस्थानच्या वतीने संदीप जाधव यांच्या देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

तसेच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतिने विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या वतीने स्वागत करण्यात आले संदीप जाधव हे स्वामी भक्त असून शिवसेना चित्रपट सेनेचे मा .अध्यक्ष आहेत तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात त्यांनी रेगे सारख्या अनेक मराठी चित्रपटांना प्रोड्युस केले आहे स्वामी दर्शनाने सुखावले असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी त्यांच्या समवेत रिपाइंचे प्रा.राहुल रुही व शिवसेना शहर प्रमुख योगेश पवार उपस्थित होते.

Related posts