अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे कडुन सर्वसामान्य जनतेला पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या हस्ते मास्क वाटप करण्यात आले .
अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील कोव्हीड रुग्णाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पोलीस प्रशासन आपले पद्धतीने रोजची कोरोनाच्या अनुषंगाने कारवाई सुरूच आहे. तरी परंतु अक्कलकोट शहरातील काही लोक तोंडाला, रुमाल, साधे कापड असे बांधून वावरताना दिसल्याने पोलीस निरीक्षक पवार यांनी आज अत्यावश्यक सेवेच्या वेळेमध्ये सतत लोकांची ये-जा होणाऱ्या ST स्टँड चौक
व कारंजा चौक या महत्वाच्या दोन ठिकाणी अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडलेल्या सर्वसामान्य जनतेला 500 ते 800 मास्क वाटप करण्यात आले. तसेच पोलीस ठाणेच्या मेगा फोनद्वारे लोकांमध्ये जागरूकता व सुरक्षिततेची जाणीव करून कोरोनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करणे बाबतचे आवाहन पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी केले.
यावेळी API देवेंद्र राठोड वाहतुक पोलीस अंमलदार नितीन चव्हाण, बिरना वाघमोडे, अंबादास दुधभाते, अंबादास कोल्हे, गोपनीय पोलीस अंमलदार धनराज शिंदे आणि गजानन शिंदे आदी उपस्थित होते .