लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद।
———–///——–////—//—–
आज जागतिक धर्म दिवस आजच्या या जागतिक धर्म दिनी शब्दरूपाने मानव धर्म पाळण्याचा केलेला एक छोटासा प्रयत्न व खारीचा वाटा–
भारत हा विविध धर्मांनी विविध परंपरांनी विविध चालीरितीनी नटलेला, सजलेला सुजलाम-सुफलाम झालेला देश आहे आपल्या भारत देशात विविध जाती धर्म संप्रदाय गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात मग तो कोणत्याही धर्माचा पंथांचा असो भारतीय लोकशाहीने सर्व जीवांना समान अधिकार, समान न्याय, समान कायदा ,समान वागणूक दिलेली आहे खरं तर जगात सर्वश्रेष्ठ ठरलेली आपली भारतीय लोकशाही तसेच भारतीय संस्कृती आहे भारतीय संविधान व सर्वात मोठी लोकशाही हे आपल्या भारताचे मुख्य वैशिष्ट आहे
मित्रांनो आज 17 जानेवारी जागतिक धर्म दिवस आहे आजच्या जागतिक धर्म दिनी धर्म दिनाच्या सर्व धर्मीय बांधवांना हार्दिक हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा! सर्वधर्मसमभाव हा आपल्या देशाचा, लोकशाहीचा मूलमंत्र आहे सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा हम बुलबुले है इस्की यह गुलसिताँ हमारा माझ्या मते सर्वात मोठा धर्म म्हणजे मानवता धर्म होय मानवता हाच सर्वात मोठा धर्म आहे
ईश्वराने आपल्याला सर्व जिवापेक्षा अनोखा, अनमोल असा मानवी जन्म दिला आहे सर्व प्राण्यांमध्ये आपल्याला मन, मेंदू, बुद्धी ही वेगळी दिली आहे विचार करण्याची शक्ती दिलेली आहे पशुपक्षी प्राण्यांना फक्त आपले पोट भरायचे कळते ते जास्त इतर विचारात पडत नाहीत हा समूहाने राहतात एकतेने राहतात वेळ प्रसंगी एकमेकांना मदत सुद्धा करतात माणसांपेक्षा आपण प्राण्यांचे मानवतेचे उदाहरणे पाहिलेले आहेत ना त्यांना जात ,ना धर्म, ना संप्रदाय , पशु-पक्षी प्राण्यांना सुद्धा देवाने प्रेम दया भाव दिले आहेत याची प्रचिती आपल्याला आधुनिक काळात सुद्धा येत आहे जगातील सर्वात मोठा धर्म म्हणजे मानव धर्म होय
मानवाने आपला माणुसकी धर्म पाळावा भारत ही संत महंतांची भूमी आहे तशी ती शूर वीरांची भूमी आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी तर जगात शांतता नांदण्यासाठी देवाकडे पसायदान मागितले आहेत ते जगाच्या कल्याणासाठी शांततेसाठी प्रेमासाठी सर्व धर्म समभाव साठी हे विश्वचि माझे घर अशी अनमोल शिकवण देणारे लाख मोलाची संत परंपरा आपल्या देशाला लाभलेली आहे सर्व धर्मीयांच्या अनमोल अशा ग्रंथांमधून ज्ञानेश्वरी, भगवत गीता ,कुराण, बायबल असा अनमोल साहित्य रत्ना मधून मानवता हाच खरा धर्म आहे अशी शिकवण मिळते
कोणाला हसू नये ,खोटे बोलू नये, सत्य अहिंसा परमो धर्म मानावा, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ प्राचीन काळापासून हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई म्हणत आपले जगणे आनंदाचे, दुसऱ्याचे जगणे आनंदाचे करणे म्हणजेच मानवता धर्म पाळणे होय आपल्या धर्माचा अभिमान असावा स्वाभिमान असावा पण धर्मवेडा नसावा आपल्या कार्यामुळे ,कामामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये असे वागणे म्हणजेच मानवताधर्म जपणे होय निसर्गातील, पर्यावरणातील उदाहरण घेतले तर बघा निसर्गात लहान लहान प्राण्यापासून ते मोठ्यात मोठे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात पण ते आपापल्या कामात व्यस्त असतात आपल्या समूहात राहतात खारी पासून मोरा पर्यंत चिमणी पासून घारी पर्यंत तर सशा पासून हत्ती पर्यंत सगळे आपापले नित्यकर्म करीत राहतात व आनंदाने आपले जीवन जगतात माणसानं सुद्धा आपल्या पर्यावरणा कडून निसर्गाकडून शिकले पाहिजे एक तेचे महत्त्व,
एकीचे बळ त्याला कळले पाहिजे कोरोनाच्या भयंकर अशा काळात शत्रू राष्ट्र आपल्याला कमकुवत करण्यासाठी विविध षडयंत्राचा वापर करीत आहेत धार्मिक जातिभेद करून जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा खूप कसोशीने प्रयत्न करीत आहेत परंतु आपल्या भारतातील एकसंघता एकसंघ भावना सर्व धर्म समभाव त्यांना टिकू देत नाही आपल्या भारत देशाचा आत्मा म्हणजे खेडेगाव होय खेडे गावात राहणारी ही सर्व कष्टकरी, कामकरी, शेतकरी, मजूर वर्ग, आजही बाराबलुतेदार खेड्या खेड्यातून राहतात व गुण्यागोविंदाने आपला व्यवसाय करतात त्यांनी केलेली प्रत्येक वस्तू बाजारात येते आणि आपण ती आनंदाने खरेदी करतो मग ती झाडू,फ़ड्या पासून ते मटक्या पर्यंत या प्रत्येक वस्तू वस्तुत त्यांचे प्रेम, त्यांची बंधुता, एकता प्रेम दडलेलं आहे आपल्याला त्यातील बंधुभाव दिसून येतो माणुसकीचे नाते मानवतेचे आणखी ठळक वैशिष्ट्ये म्हणजे आपल्याला सणा सणा मधुन, उत्सव महोत्सवांमधून दिसून येते असेच आपल्या
देशातील सर्व धर्मियांचे नाते प्रेमाचे एकोप्याचे बंधुत्वाचे राहो या भारतात बंधुभाव नित्य वसु दे दे वरचि असा दे हीच आज जागतिक धर्म दिनानिमित्त ईश्वराकडे प्रार्थना करतो पुनश्च एकदा जागतिक धर्म दिनाच्या सर्व धर्मियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
जय हिंद- जय भारत ! 🙏🏻🙏🏻