कार्यतत्पर व सेवाभावी डॉक्टर- – – – डॉ. किरण पवार
…………………………………….
लेखक
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद
……………………………………….
समाजात अशी काही माणसे असतात ती निस्वार्थ भावनेने समाजासाठी समाजातील लोकांसाठी झटत असतात आपल्यापेक्षा समाज महत्त्वाचा वाटतो समाजातील लोक व त्यांचे आरोग्य महत्त्वाचे वाटते कोरोना संसर्गाच्या या काळात स्वतःला झोकून देऊन कार्य करणारी अशी व्यक्ती त्यांच्या या कार्यातून त्यांनी आपला सेवाभाव प्रत्यक्ष दाखवून दिलेला आहे
प्राचीन काळापासून डॉक्टर म्हणजे देवच असतात अशी माणसाची भावना विश्वास बसलेला आहे तो त्यांच्या कार्यावर कर्तृत्वावर त्यांनी केलेल्या माणसाच्या निदानावर व उपचारावर कित्येक वेळा डॉक्टरांनी पेशंटचा जीव वाचवले ला आहे किंवा एखाद्या व्यक्तीला डॉक्टर मुळे जीवदान मिळालेले आहे असे आपण नेहमी म्हणतो आणि ऐकलेलं ही आहे आज आपण अशाच एका आगळ्यावेगळ्या प्रेरणादायी सकारात्मक व्यक्तिमत्व कार्यतत्पर जिद्दी मेहनती डॉक्टरांच्या कार्याबद्दल विशेष माहिती घेणार आहोत खरोखरच डॉक्टरांचं कार्य किती मूल्यवान असते बघा कितीही आजारी व्यक्ती असला आणि तो डॉक्टरांकडे गेला तर त्याला औषधोपचारांनी दुरुस्त करूनच ते पाठवतात अशी त्यांची तळमळ असते आपल्याकडे आलेला आजारी व्यक्ती हा दुरुस्त झालाच पाहिजे असे त्यांचे वचन असते.
आज आपण उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे कार्यरत असलेले डॉक्टर किरण पवार यांच्या कार्याचा आढावा घेणार आहोत त्यांचे पूर्ण नाव किरण भुजंगराव पवार असे आहे . तुळजापूर तालुक्यातील खंडाळा हे त्यांचे जन्मगाव आहे त्यांनी त्यांचे वैद्यकीय शिक्षण (बी ए एम एस) पुणे येथे पूर्ण केलेले आहे. सर्वसामान्यांचे डॉक्टर म्हणून तुळजापूर तालुक्यात प्रसिद्ध असलेले डॉक्टर किरण पवार हे जवळपास 1999 पासून सतत रुग्णांची, समाजाची सेवा करीत आहेत. जवळपास गेल्या वीस ते बावीस वर्षापासून ते रुग्णांना अविरत सेवा देण्याचे कार्य करीत आहेत. वेळी-अवेळी रुग्णांना भेटणे, त्यांच्या तब्येतीची विचारपूस , काळजी घेणे, येणाऱ्या प्रत्येक पेशंटचे हसतमुखाने स्वागत करून त्यांचा अर्धा आजार कमी करण्याची कला किंवा गुणवैशिष्ट सरांचे आहे. अत्यंत मनमिळावू व विनम्र स्वभाव ही खास त्यांची वैशिष्ट्ये अंतकरणातून सेवाभावी वृत्ती असणे,मनापासुन रुग्णांची सेवा करणे हेच ध्येय व उद्देश डोळ्यासमोर ठेवून सेवा करणारे डॉक्टर म्हणून तुळजापूर व परिसरात नावारूपाला आलेले कार्यतत्पर, कर्तव्यनिष्ठ व सेवाभावी डॉक्टर म्हणजे किरण पवार सर होय. गोरगरिबांसाठी कमीत कमी खर्चात, अत्यल्प दरात अगदी चांगला उपचार करणारे व आजार दूर करणारे एक विश्वासू डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती आहे . समाजातील एक जबाबदार घटक म्हणून सेवाभावाने ते अविरत रोग्यांची सेवा करीत आहेत. सर्वसामान्यांसाठी, गोरगरिबांसाठी दिनाचा कैवारी म्हणून त्यांचा गौरव केला तरी काही नवल नाही.
आजच्या या कोरोना महामारी च्या काळात प्रत्यक्ष देव रूपाने कार्य करीत असलेले कोरोना योद्धा आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना किट परिधान करून सकाळी नऊ वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सतत रुग्णांची तपासणी व त्यांच्या वरील उपचार चालू असतो.या वेळेत त्यांना चहा किंवा पाणी सुद्धा पिता येत नाही . त्यांच्या विशेष कार्याबद्दल सांगायचं म्हणजे तुळजापूर तालुक्यातील यमगर वाडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत त्यांनी कसलीही फीस घेतलेली नाही .वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक इथे नसतात, त्यांच्याजवळ वेळीअवेळी पैसे नसतात ,अचानक आजारी पडणे, खेळामध्ये जखमी होणे ,डोके फुटणे, पायाला जखम होणे अशा आकस्मिक घटना घडतात .अशावेळी ते डॉक्टरांकडे धाव घेतात अशा विद्यार्थ्यांनाही फीस न घेता ते उपचार करतात. तसेच तुळजापूर येथील सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा ते मोफत उपचार करतात. त्याचप्रमाणे तुळजापूर शहरापासून जवळ असलेल्या भटके विमुक्तांच्या वसाहतीतील लोकांची सेवा सुद्धा गेली दहा वर्षापासून ते विनामूल्य करीत आहेत .ज्यांचे हातावरचे पोट आहे , ज्यांना उद्या काय खायचं याची चिंता आहे , हाताला काम नाही व काम नसल्यामुळे दाम नाही अशा गोरगरिबांचे , मजूरदार यांची सुद्धा सेवा त्यांनी अत्यल्प दरामध्ये केलेली आहे. हे त्यांच्या कार्याचं व त्यांच्या मनाचे मोठेपण आहे.
समाजातील लोकांसाठी एक सकारात्मक विचार व सकारात्मक कार्य आहे .समाजाला योग्य दिशा देणारे व प्रेरणा देणारे कार्य आहे. भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी व नव तरुणांसाठी ते संदेश देतात ,सर्वप्रथम आपले आरोग्य सांभाळा आरोग्य निरोगी असले पाहिजे .यासाठी व्यसनापासून दूर राहा ,योग्य आहार घ्या , व्यायाम करा. योग्यवेळी झोप घेणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर मूल्य संस्कार याबद्दल ते म्हणतात, आधुनिक विद्यार्थ्यांमधील मूल्य संस्कार हळूहळू कमी होत आहेत. मोठ्या बद्दल आदर बाळगा व आपल्या जीवनामध्ये शिक्षणाला महत्त्व देऊन ध्येय निश्चित करा म्हणजे आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ!