साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक – मराठवाडा
धाराशिव (उस्मानाबाद) येथे शहराच्या पाणी प्रश्नावर मात करण्यासाठी अमृत अभियान अंतर्गत नव्याने उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे नगरविकास व बांधकाम मंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला.
जिल्ह्याला यापुर्वीच्या राजकाऱ्यांनी कित्येक वर्षे विकासाची स्वप्नं दाखवली परंतु कुठला हि उद्योग चालू न करता जनतेची दिशा भुल केली आहे. जिल्ह्याचे लोकप्रिय तथा विकासाभिमुख खा. मा. ओमराजे निंबाळकर हे लोकसभा सदस्य झाल्यापासून जिल्ह्याच्या संदर्भात प्रामुख्याने चार मुख्य विषयांवर,
1) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर करणे.
2) 21 TMC पैकी 7 TMC पाणी कृष्णा खोऱ्यातून जिल्ह्यात आणणे.
3) सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती यांच्या साठी 10 ते 15 हजार युवकांना काम मिळेल असा उद्योग आणणे.
4) उस्मानाबाद येथे विद्यापीठ उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करणे,
यासाठी कार्यरत आहेत. त्याला विद्यापीठात रूपांतर करण्याच्या संदर्भात मार्गक्रमण चालू आहे. गेल्या बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत नविन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुर झाले असुन लवकर येत्या दिवसात ते पुर्ण होणार आहे.
अशा प्रकारेच 7 TMC पाणी कृष्णा खोऱ्यातून जिल्ह्यात आणणे, जिल्ह्यात उद्योग उभारणे, उपकेंद्र केंद्राचे विद्यापीठात रूपांतर करण्याच्या संदर्भात धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील जनतेच्या पाठीमागे बळ द्यावे असे आवाहन मंत्री महोदयांना यावेळी केले. तसेच शहरातील भुयारी गटार योजनेला मान्यता दिल्याबद्दल व शहरास पाणी आणण्यासाठी समांतर पाईपलाईन योजनेस देखिल सकारात्मक दृष्टीने पाहु असे अभिवचन दिल्याबद्दल जिल्ह्याच्या व शहरवाशीयांच्या वतीने मा. खा. ओमराजे निंबाळकर व आ. कैलास पाटील यांनी मन:पुर्वक आभार मानले.
याप्रसंगी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक साहेब, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, आ.ज्ञानराज चौगुले, लातूर शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, नगराध्यक्ष नंदूभैय्या राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे, उपाध्यक्ष धनंजय सावंत आदी उपस्थित होते.