अक्कलकोट ( प्रतिनिधी ) –
श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याने तरुण वयातच आपली स्वामी कृपेने दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड होऊन सेवेची संधी मिळाली असल्याचे मनोगत नूतन सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी व्यक्त केले, ते नुकतेच दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर बोलत होते.
याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपा वस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे यांच्यासह शशिकांत बकरे, रामचंद्र समाणे, गुरु म्हेत्रे, सुनील इसापुरे, मुबारक कोरबू, राहुल बकरे, संजू आडवितोटे आदी उपस्थित होते.