प्रतिनिधी – प्रतिक शेषेराव भोसले
उस्मानाबाद (धाराशिव)
उस्मानाबाद – वर्ष अखेर अर्थात ३१ डिसेंबर हा दिवस शौकीन लोक विविध प्रकारे साजरे करतात, पण समाज कार्यात अग्रेसर असणाऱ्या विवेकानंद युवा मंडळाने यंदापासून एक नवीन उपक्रम सुरु केला आहे, या दिवशीच मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण साळुंके यांचा वाढदिवस असतो, याचे औचित्य साधत जिल्हाभरातील विवेकानंद युवा मंडळाच्या विविध शाखांनी जनजागृतीसह अन्नदान करून कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला..
यामध्ये प्रामुख्याने व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. त्याचबरोबर उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ देऊन त्यांना या शपथविधीसाठी सन्मानपत्र देऊन मंडळातर्फे सत्कार देखील करण्यात आला. तुळजापूर शहर, उमरगा शहर, कळंब, लोहारा, भूम, वाशी, परंडा या सर्व शाखांमधील कार्यकर्त्यांनी एकूण तेवीस डझन केळीचे वाटप व तेवीस किलो जिलेबीचे वाटप करून अध्यक्षांचा वाढदिवस व नववर्षाचे स्वागत केले. या जनजागृतीपर कार्यक्रमासाठी विविध राजकीय, सामाजिक व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी चांगला प्रतिसाद व मदत केली.
यावेळी विवेकानंद युवा मंडळाचे राज्य समन्वयक स्वप्नील देशमुख, महेंद्रप्रताप जाधव, समर्थ शिरसीकर, शुभम मगर, आबा सुरवसे, बबलू सुरवसे, पंचाक्षरी स्वामी, सिद्धार्थ क्षीरसागर, प्रतीक खमितकर, नेहरू युवा केंद्राचे रोहन गाढवे, प्रशांत मते व आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. या जनजागृतीपर कार्यक्रमांमुळे जिल्हाभरातून त्यांचे कौतुक होत आहे.