महाराष्ट्र

तानाजी म्हेत्रे यांची शिक्षक भारती संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी निवड

उपाध्यक्ष पदी मा. तुषार सूत्रावे तर जिल्हा आदिवासी सेलच्या अध्यक्ष पदी डॉ. विजय वडावराव यांची नियुक्ती.

साईनाथ जगन्नाथ गवळी
तुळजापूर/उस्मानाबाद(धाराशिव)
प्रतिनिधी.

तुळजापूर तालुक्यातील तिर्थ (बुद्रुक) येथील शिक्षक तानाजी म्हेत्रे यांची शिक्षक भारती संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. शिक्षकांच्या हक्कासाठी व शिक्षणाच्या सन्मानासाठी शिक्षक कर्माऱ्यांची संघटना असून संस्थापक आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली व शिक्षक भरतीची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक बेलसरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाच्या न्यायासाठी कार्यरत आहे.

सदर शिक्षक भरतीच्या संघटनेच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील तीर्थ (बद्रुक) येथील तानाजी सयाजी म्हेत्रे यांची संघटनेच्या तर उपाध्यक्ष तुषार सुत्रावे तसेच जिल्हा अदिवासी सेल अध्यक्ष म्हणून विजय वडवराव यांना दि.२६ रोजी जिल्हा अध्यक्ष भैरवनाथ कानडे व उपाध्यक्ष प्रविण गुरव यांनी नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी तालुक्यातील सुनील चव्हाण, रमाकांत स्वामी, सतिश गायकवाड,पांडुरंग पवार आदी शिक्षक उपस्थित होते.

Related posts