सचिन झाडे –
पंढरपूर –
सोलापूर जिल्हा काँग्रेस सेवादलाचे माजी अध्यक्ष आणि उदयोगपती तसेच सहकार शिरोमणी सह साखर कारखान्याचे संचालक नागेशदादा फाटे यांचे डिजिटल कॅनव्हास पेंटींगच्या सहाय्याने त्यांचेच वर्गमित्र आणि पटवर्धन कुरोली येथील शाळेचे चित्रकला शिक्षक नामदेव देशमुख यांनी आभासी चित्र रेखाटून फाटे यांना भेट दिले आहे.
पूर्वी रंगाच्या साहाय्याने चित्र रेखाटली जात होती, त्यासाठी कमीतकमी रंग वाळण्यासाठीदोन महीनेचा कालावधी लागत होता. त्यामुळे आता अशाप्रकारे तैलचित्र रेखाटण्यासाठी संगणकातील रंगाच्या आता ही तैलचित्रे अवघ्या एक एक ते दीड दिवसात रेखाटने सोपे झाले आहे अशी माहिती नामदेव देशमुख यांनी दिली. आजपर्यंत देशमुख यांनी अनेक नेते आणि इतर मान्यवरांची तैलचित्रे रेखाटली होती, त्याचे मानधनही त्यांना देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
हाताने रंगकाम करून ही व्यक्ती चित्रे रेखाटनेची कला कालबाह्य होत चालली असून संगणकीय युगात हे काम सोपे झाले असून सद्या सोशल मीडियावर विविध प्रकारच्या कार्यक्रम वाढदिवस यासाठी या कलेचा ओढा वाढला आहे.
नागेशदादा फाटे हे संयमी आणि दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वपरिचित आहे. अशा या सामाजिक कार्यकर्त्यांचे हे व्यक्तिचित्र रेखाटून ते चित्र आपण फाटे यांना दिले यावेळी आपणाला खूप समाधान लाभले असल्याचे ही देशमुख सर यांनी सांगितले.