सचिन झाडे पंढरपूर प्रतिनिधी
एक देश एक बाजार पेठ कायद्याच्या समर्थनार्थ आणि व्यापारी आणि बाजार समित्यांच्या विरोधात आज रयत क्रांती शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथील बाजार समितीच्या गेट समोर आंदोलन केले.
एक देश एक बाजारपेठ केंद्र सरकारने देशभर कायदा लागू केल्या आहे. त्यानंतर राज्य सरकारने देखील पाच जून पासून हा कायदा महाराष्ट्रात लागू केला आहे.
दरम्यान या शेतकरी हिताच्या कायद्याला काही बाजार समित्या आणि व्यापार्यांनी विरोध दर्शवत आज बाजार समित्या बंद ठेवल्या आहेत.
शेतकर्यांना वेठीस धरणार्या बाजार समित्या आणि व्यापार्यांच्या विरोधात रयत क्रांती संघटनेच्या वतीने राज्यभरात प्रती आंदोलन केले.
पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी ही केंद्र आणि राज्य सरकारने लागू केलेल्या कायद्याच्या समर्थनार्थ घोषणा देत बाजार समितीच्या विरोधात आंदोलन केले.