उस्मानाबाद 

केंद्र सरकारच्या पिक विमा कंपनीने 2022 मधील प्रत्यक्ष शेतकऱ्याला प्रति हेक्टरी 34,500 द्यावे – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक – मराठवाडा

आज दिनांक 09 डिसेंबर 2022 रोजी लोकसभेच्या 10 व्या सत्राच्या शुन्य प्रहारामध्ये धाराशिव लोकसभा मतदार संघातील उस्मानाबाद जिल्हा, सोलपूर जिल्ह्यातील बार्शी तालुका आणि लातूर जिल्ह्यातील औसा व निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून खरीप हंगाम 2022 च्या प्रधानमंत्री पीकविम्याच्या अनुषंगाने पीकविमा कंपनीच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारत शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 34 हजार 500 रुपयांप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यासाठी सामान्य शेतकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले.

प्रधानमंत्री पीकविमा योजना ही नेमकी शेतकऱ्यांसाठी आहे की विमा कंपन्यासाठी आहे असा प्रश्न उपस्थित करत खरीप हंगाम वर्ष 2022 मध्ये धाराशिव मतदार संघातील जवळपास 10 लाख 49 हजार शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता.जुन ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सततच्या पावसामुळे सोयाबीनचे पीक हे संपुर्णत: शेतकऱ्यांच्या हातून गेले 80 % नुकसान ग्रहित धरले तर जवळपास 34 हजार 500 प्रति हेक्टर नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित असताना केंद्र शासनाच्या ॲग्रीकल्चर इंन्शुरंन्स कंपनीने नुकसान भरपाई देताना असमानता केली असून एकाला 500 रुपये तर एकाला 15 हजार रुपयेप्रमाणे नुकसान भरपाई देवून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे.

शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत पीकविमा कंपनीस नुकसान झाल्याच्या तक्रारी कळविल्या होत्या कंपनीच्या प्रतिनिधीमार्फत प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष पाहणी करुन पंचनामे करण्यात आले त्यानंतर प्रतिनिधींकडून नुकसान झालेल्या पिकांची टक्केवारी व बाधित क्षेत्रफळ यात तफावत निर्माण केली गेली. कंपनीकडून फक्त सततच्या पावसामुळे आलेल्या तक्रारीच स्विकृत केल्या व पेस्ट ॲटॅक च्या संदर्भाने आलेल्या तक्रारी ग्राह्य धरल्या नाहीत जर अशा प्रकारच्या तक्रारी ग्राह्य नसतील तर विमा पोर्टलवर नुकसान भरपाई तक्रार देण्यासाठी पेस्ट ॲटॅक हा पर्याय देवून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम का निर्माण केला गेला असा प्रश्नही लोकसभेच्या अधिवेशनामध्ये खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उपस्थित केला.
धाराशिव मतदार संघासाठी ॲग्रीकल्चर इंन्शुरंस कंपनी ऑफ इंडिया ही सरकारी कंपनी असून सदर कंपनीने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेणे अपेक्षित असतानासुध्दा नफेखोरीच्या लालसेपोटी पेस्ट ॲटॅकच्या संदर्भात आलेल्या तक्रारी नाकारत असमान पध्दतीने पीकविम्याच्या रकमेचे वितरण केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

याकडे केंद्रसरकारने व राज्यसरकारने तात्काळ लक्ष देवून शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 34 हजार 500 प्रमाणे समान प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सभागृहाच्या माध्यमातून केली.

Related posts