अक्कलकोट

विकास कामाच्या माध्यमातून गांवचे रुप बदलावेत  – शिवशरण खेडगी 

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी भरीव विकास कामाच्या माध्यमातून गांवचे रुप पालटण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शिवशरण खेडगी यांनी केले.

येथील सी. बी. खेडगी इंटरनॕशनल स्कूल च्या सभा मंडपात अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी व सी. बी. खेडगी महाविद्यालय परिवार यांच्या वतीने नूतन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व एम. बी. बी. एस. पदवी प्राप्त विद्यार्थिनीच्या सत्कार समारंभात अध्यक्षस्थानावरुन  चेअरमन खेडगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी प्राचार्य डाॕ. एस. सी. आडवितोटे, उपप्राचार्य दत्ताञय फुलारी, पर्यवेक्षिका वैदेही वैद्य, माजी उपप्राचार्य परमेश्वर अरबाळे आदि उपस्थित होते.

खेडगी पुढे म्हणाले, गावा- गांवात अनेक कामे प्रलंबीत असून ती लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावे. सर्व सदस्यानां व ग्रामस्थ मंडळानां विश्वासात घेऊन नव-नविन योजना राबवावेत. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी एकञितरित्या विकास कामे करुन गावाला आदर्शगांव म्हणून नांवलौकिक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. ग्रामस्थ मंडळांचा विश्वास सार्थ ठरवावेत. ५० टक्के आरक्षण असल्यामुळे राजकीय क्षेत्रातही महिलांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे.

खेडगी महाविद्यालय परिवार व तालुक्यातील जनतेची ऋणानुबंध निरंतर असणार असल्याचे सांगून 

नूतन सरपंच उमेश पाटील म्हणाले, 

निवडणुका झाल्या की सर्व मतभेद विसरून गावच्या विकासासाठी एकत्र येत असतो. हीच परंपरा सर्वांनी जोपासायची आहे. गावचे नेतृत्व करताना सर्वांना सोबत घेणार आहे. शासकीय योजना प्रभावीपणे राबवताना सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्याचे काम करणार आहे. शासकीय योजनांच्या पाठपुराव्यासाठी आपण कायम प्रत्येकाच्या पाठिशी उभे आहोत. प्रत्येक खेडेगाव विकासातून पुढे जात असून आगामी पाच वर्षात शिक्षण, ग्रामीण अर्थव्यवस्थेमुळे गाव हे विकासाचे मॉडेल ठरणार आहेत. आता यामध्ये अधिकाधिक काम करताना विकासातून वैभवाकडे जाताना प्रत्येक गाव हे आदर्श होईल यासाठी प्रत्येकाने काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

यावेळी नूतन सरपंच उमेश पाटील, उपसरपंच डाॕ. अपर्णा बाणेगांव, ग्रामपंचायत सदस्या शांताबाई प्रचंडे, जयश्री पुजारी, बुक्कानुरे व एम. बी. बी. एस. पदवी प्राप्त डाॕ. शिवलिला माळी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.

प्रास्ताविक भाषण डाॕ. शिवराया आडवितोटे यांनी केले.

सूञसंचालन प्रा. शिवशरण अचलेर यांनी केले तर मराठी विभाग प्रमुख डाॕ. चौडप्पा कांबळे यांनी आभार मानले.

या समारंभास शरणप्पा प्रचंडे, स्वामीनाथ बेळ्ळे, बसलिंगप्पा माळी, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Related posts