अशोक सोनकंटले
विशेष प्रतिनिधी दक्षिण सोलापूर
दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदीचे पात्रातील पाणी दिवसेंदिवस कमी होत आहेत,तसेच बंधा-यावरील दरवाजे नादुरुस्त असल्याने पाणी कर्नाटकात वाहून जात आहे,दक्षिण व उत्तर सोलापूर तसेच अक्कलकोट तालुक्यातील शेती व पशुधन वाचण्यासाठी सीना नदी वाहती ठेवणे गरजेचे असून तातडीने सीना नदीत उजनी धरणातून पाणी सोडावेत अशी मागणी राष्ट्रवादीचे दक्षिण सोलापूरचे नेते बाळासाहेब बंडगर-पाटील यांनी केली आहे.
बाळासाहेब बंडगर म्हणाले, दरवर्षी उन्हाळ्यात सीना नदी कोरडी पडते,शेतक-यांनी सातत्याने मागणी करूनही नदीत पाणी सोडले जात नाही,
परिणामी,दरवर्षी,शेतातील विविध पिके आणि जीवापाड जपलेले पशुधन कसे जगवायचे या विचारचक्रात सीनाकाठचा शेतकरी सापडतो.सीना नदीच्या पात्रावरील उत्तर सोलापूर तालुक्यातील मधील नंदूर, डोणगाव, समशापूर या गावांची तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले, गुंजेगाव, गावडेवाडी,मनगोळी, वडकबाळ,राजूर, होंनमुर्गी,हत्तूर,चंद्रहाळ,औराद, बंदलगी, संजवाड, बोळकवठा,हत्तरसंगकुडल आणि अक्कलकोट तालुक्यातील कोर्सेगाव, कुमठे,कल्लकर्जाळ, धारसंग, चिंचोळी,केगाव या गावांची जिरायत व बागायत शेती अवलंबून आहे.येत्या कांही दिवसात सीनेच पात्र कोरडे पडणार असल्याने या गावची शेती धोक्यात येणार आहे.यंदा उजनी ओव्हरफ्लो झाल्याने सीना नदीकाठी मोठया प्रमाणात ऊस,केळी,द्राक्षेची लागवण करण्यात आली आहे. काही दिवसानंतर पाण्याअभावी ही पिके करपून जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही,तसेच पशुधनासाठी वैरणचाही प्रश्न निर्माण होणार आहे.या पिकांना आगामी महिन्यात पाण्याची नितांत गरज पडणार आहे.जर सीना नदी पात्रात तसेच या भागातील कालव्यात पाणी सोडले नाही.तर ही पिके हातची जाणार आहेत.त्यामुळे शेतक-यांना मोठया प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे.
सीनेत आणि कालव्यात तातडीने पाणी सोडल्यास ही आदी पिके जीवंत राहणार आहेत.या भागातील शेतकरी व जनतेचा शेतीच्या उत्पन्नाशिवाय दुसरे कोणतेच उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे कांहीही करून शेतातील उभी पिके व पशुधन वाचविणे गरजेचे आहे. प्रशासनाने या मागणीचा सहानभुतीपूर्वक विचार करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सीना नदीत पाणी सोडून शेतकऱ्यांना सहकार्य करावे..
सीना नदी कोरडी पडणार असल्याने शेतीचा व पशुधनाचा पाणी प्रश्न गंभीर बनणार आहे.आपण यापूर्वी सीना व भीमा नदीत उजनी धरणातून टेलएंडपर्यत पाणी सोडण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले आहेत.यापुढील काळात देखील आपण शासनाकडे तसेच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सीना व भीमा नदीत टेलएंडपर्यत पाणी सोडावेत अशी मागणी करणार आहोत.
– बाळासाहेब बंडगर- पाटील