अक्कलकोत ( प्रतिनिधी ) – हन्नूर ग्रामपंचायतीच्या वतीने ताण तणाव मुक्तीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या आदेशान्वये तान तनाव मुक्त जनजागृती अभियान राबविण्यात आले. गावांमध्ये प्रभातफेरी काढून.याची जनजागृती करण्यात आली यावेळी सरपंच सोनाली तलवार उपसरपंच सागर कल्याणशेट्टी ग्राम विकास अधिकारी दयानंद बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये ही रॅली संपन्न झाली
यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रा गौतम बाळशंकर ,मुख्यध्यापक आशा सोमदाळे, विजय गायगवळी यांनी ही मार्गदर्शक केले. यावेळी मंडळ अधिकारी राजकुमार कोळी, तलाठी दत्तात्रय पांढरे ,चपळगाव तलाठी वाय के जायवार, जावेद मुलानी, अशोक साळुंखे, बालाजी पवार, सय्यद फिरदोस मॅडम ,आशा वर्कर ज्योती कोरे, मायावर घोडके, ग्रामपंचायत सदस्य तथा आशा वर्कर जयश्री भरमशेट्टी , लक्ष्मण पुजारी ,लक्ष्मण बाळशंकर, तुळशीराम इरवाडकर आदी उपस्थित होते या जनजागृती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार समाज सेवक सोपान निकते यांनी केले