अक्कलकोट

अक्कलकोट तालुका व शहर काँग्रेस कमिटीकडून तहसिलसमोर उपोषण

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) –

केंद्रातील मोदी सरकारने अतिशय घाईगड़बडित कोणतेही चर्चा न करता पारित केलेले शेतकरी विरोधी तीन काळे कृषी कायदे रद्द करावेत, कामगार कायद्यातील बदलामुळे कामगार देशोधड़ीला लागणार आहेत तसेच तसेच पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर दरवाढ, व महागाईच्या मुद्द्यावर केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात शेतकरी संघटनांनी दिनांक 26 मार्च 2021 रोजी ” भारत बंद ” पुकारला आहे. या भारत बंदला काँग्रेस पक्षाने सक्रिय पाठिंबा दिला असून अक्कलकोट तालुका व शहर काँग्रेस कमिटी वतीने नविन  तहसिल कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी उपोषण करण्यात आले.तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

या उपोषणात  सोलापुर काँग्रेस जिल्हा कार्याअध्यक्ष अशपाक  बळोरगी,माजी कृषी  सभापती मल्लीकार्जुन पाटील, पंचायत समितीचे सभापती सुनंदा गायकवाड, माजी सभापती विलास गव्हाणे ,शहर काँग्रेस अध्यक्ष भिमाशंकर कापसे,माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड,महिला शहर अध्यक्ष सुनिता हडलगी, युवक अध्यक्ष बाबाबासाहेब पाटील, जिल्हा युवक उपाध्यक्ष धर्मराज गुंजले, शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख ,नगरसेवक विकास मोरे,

माजी नगरसेवक सुनिल खवळे, अभय खोबरे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा माया जाधव ,अरूण जाधव,काका पाटील,पुडंलीक बिराजदार,गणेश अलोळी, मैनुदीन कोरबु,बबन पवार,महादेव चुंगी,नागेश बिराजदार,शिवशरण इचगे,अयाज चंदनवाले,बालाजी शापवाले , विश्वनाथ हडलगी आदींसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts