🙂नवीन आशा तव धिक्कार🙂
संगीताला केवळ स्वरांची साथ असते. ..
आपुलकीने जगायला माणुसकी लागते…..
दुधामध्ये मिठ टाकुन पहा दुधही नासते…..
केवळ संकटाच्याच वेळी आपल्यांची साथ भासते….
प्रत्येकाला फक्त आपुलकी आणि प्रेम द्या तुमच्या अंगणात सौभाग्य सदा नांदते…….
आपले भविष्य पहायला ब्राह्मणच लागतो असं नाही…
आपल्या उज्ज्वल आयुष्यावर विचार करताना चांगले कर्म तर करा काही….
मनगटातील ताकद आणि डोक्यातील मेंदु संकटांना देउ शकतो मात…
अरं भिऊन काय बसलाय “मि हे करणारच” म्हणुन नविन जीवनाची पेटवा वात….
आजकाल आपली आर्थिक परिस्थिती कशी
बदलेल तसे वागणुकीत आपण नाचतो….
अहो उपयोग नाही पैशाला किंमत तर
यालाच आपण माणसे कसे वाचतो….
आपण या जीवनाच्या पावसात उभे राहून ओले होतो तर काय उपयोग नाही विनाकारण राहुन भिजत….
आपण खुप नाती जपली असतील पण काय सांगता येत नाही, समोरच्याच्या मनात नेमके असतय काय शिजत……
बिगर माणुसकीच्या जीवनाच्या भोवऱ्यात अडकलेय सारे जग……..
प्रत्येकाला आपलेच पडलेय अश्या अविश्वासाने कशी भरल धग…….
स्वतःला सिध्द करताना आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो ….
आत्मविश्वासाने जगतोस तर अश्या पोकळ धमक्यांना का भितो ….
स्वतःच्या पायावर उभारून कमाव तुझ नाव….
तुझ्या विजयावर शिक्कामोर्तब करायला तु निडर धाव
===================================
कवि:-
–ऋषिकेश नानासाहेब लांडे-पवार
बामणी, धाराशिव.