21.9 C
Solapur
February 22, 2024
उस्मानाबाद 

कळंबच्या भूमीपुत्राचा आणखी एक विशवविक्रम 25000 दिव्यातून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा

जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

कर्नाटक येथील बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण तालुक्यातील उजळंब गावात शिवप्रताप दिनाच औचित्य साधत दीपावलीच्या पार्श्वभूमीवर येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती उजळंब यांच्या आयोजनातून छत्रपती शिवरायांना आणि स्वराज्यासाठी त्यांच्यासोबत लढणाऱ्या प्रत्येक मावळ्याला या दिपोत्सवातुन त्यांच्या कार्याला एक आगळीवेगळी मानवंदना देण्याचा इथे प्रयत्न करण्यात आला आहे या दीपोत्सवाचे वैशिष्ट्य असे आहे की 25000 दिपप्रज्वलनातून साकारली जाणारी छत्रपती शिवरायांची प्रतिमा साकारण्याचा प्रयत्न केला गेला आहे शिवप्रतिमा च्या माध्यमातून हा एक जागतिक विश्वविक्रम ठरणार आहे ही प्रतिमा 25000 दीपप्रज्वलनातून साकारली गेली असून या प्रतिमेची लवकरात लवकर जागतीकविश्‍वविक्रम म्हणून नोंद घेतली जाणार आहे त्याचबरोबर छत्रपती शिवरायांची दिपप्रज्वलन आतून साकारली जाणारी आत्तापर्यंतची जगातली पहिलीच प्रतिमा असणार आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कलाकार राजकुमार कुंभार यांच्या संकल्पनेतून ही कलाकृती साकारण्यात आली आहे त्यासाठी त्यांचे मित्र सहकलाकार आकाश नेटके उस्मानाबाद यांना सोबत घेऊन ही कलाकृती पूर्णत्वास नेली गेली आहे छत्रपती शिवरायांच्या रांगोळी पासून विविध माध्यमातील घटकांचा वापर करत राजकुमार कुंभार यांनी अनेक कलाकृती साकारल्या आहेत आणि अशा आगळ्यावेगळ्या कलाकृती मधील जवळजवळ दहा कलाकृतींची विश्‍वविक्रम म्हणून नोंद करण्यात आली आहे आज उजळंब येथे साकारण्यात आलेली छत्रपती शिवरायांची ही नैसर्गिक रित्या प्रज्वलित केलेली दीपज्योत प्रतिमा राजकुमार कुंभार यांची अकरावी विश्‍वविक्रमी प्रतिमा ठरणार आहे

Related posts