जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
कळंब:-
याबाबत सविस्तर माहिती नाही की अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केल्याप्रकरणी रवीशंकर याच्यावर राज्यभरातून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
त्याच पार्शभूमीवर आज संभाजी ब्रिगेड उस्मानाबादच्या वतीने उपविभागीय अधिकारी कळंब यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे ही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे..
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष ऍड. तानाजी चौधरी, मा. जिल्हाध्यक्ष अतुल भैय्या गायकवाड, दत्ता कवडे, अक्षय मुळीक, इमरान मिर्झा, प्रशांत गायकवाड, सुरज कवडे उपस्थित होते.