उस्मानाबाद  तुळजापूर

नांदगाव जि. प. गटामध्ये शिवसेना (उबाठा) पक्षाच्या पदाधिकारी आढावा बैठका.

तुळजापूर – शिवसेना पक्षप्रमुख, #मा_उद्धवजी_ठाकरे साहेब, यांच्या आदेशानुसार, संपर्कप्रमुख श्री. सुनिलजी काटमोरे साहेब, सहसंपर्कप्रमुख श्री. नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली, धाराशिवचे लोकप्रिय खा. ओमदादा राजेनिंबाळकर तसेच जिल्हाप्रमुख आ. कैलासदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली,

तुळजापूर तालुक्यामधील #नांदगाव जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना (उबाठा) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका पार पडल्या. या दौऱ्यादरम्यान खुदावाडी, गुजनूर, दहिटने, वाघदरी, येडोळा, लोहगाव, नांदगाव, बोरगाव, सिंदगाव, कुन्सावळी, बोळेगाव, सलगरा (मड्डी), नांदगाव अशा सर्व गावांना भेटी देण्यात आल्या. या बैठकामध्ये तेथील स्थानिक समस्या, अडि-अडचणी जाणून घेण्यात आल्या. पक्ष-बांधणीवरील समस्या, पक्षाचे कार्य अशा सर्व बाबींचा आढावा घेण्यात आला. यानंतर पक्षप्रमुख उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा सर्व शिवसैनिक पेटून उठेल आणि जोमाने कामाला लागेल असा निर्धार उपस्थित सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आला. पक्षबांधणीसाठी तसेच जनसेवेसाठी आपण वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कायम तत्पर असल्याचे तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी यांनी यावेळी उपस्थित शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले.

यावेळी तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी यांच्यासह मा. उपजिल्हाप्रमुख कमलाकर काका चव्हाण, राजेंद्र (मेजर) जाधव, सिद्धेश्वर पाटील, सतयेंद्र कबाडे, दिगंबर मोरे, सूरज साळुंखे, जितेंद्र माने, दत्तात्रय कुंभार, अंबादास कदम, अनिल जाधव, दिपक धुमाळ, आप्पा मिटकर, महादेव पवार, शुभम चव्हाण, अमर जाधव, शंकर मारेकर, कृष्णात जाधव, रघुनाथ कोकरे, सुनिल सूर्यवंशी, संतोष घोडके, अस्लम बागवान, भोजप्पा, दत्ता पाटील, रत्नदीप पाटील, भीमराव मोरे, दत्तात्रय शिरगिरे, परमेश्वर चीरगुंडे, राजेंद्र पाटील, दत्ता सुतार यांच्यासह शेकडो शिवसैनिक बांधव उपस्थित होते.

Related posts