सचिन झाडे –
पंढरपूर –
आज सोलापूर जिल्हयाचे आ. प्रशांत परिचारक यांनी भारत सरकारच्या जानेवारी महिन्यात होणाऱ्या कोरोणा प्रतिबंधक लसिकरण मोहिमेच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक घेतली.
यावेळी रुग्णालयाच्या मुख्य अधिक्षिका डॉ जयश्री ढोबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एकनाथ बोधले , नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले, पंचायत समिती उपसभापती प्रशांतभैय्या देशमुख उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव,न.पा. मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, गटविकासाधिकारी रविकिरण घोडके, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट,नागेश भोसले यांचेसह नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी आ.प्रशांत परिचारक यांनी रुग्णालयाच्या सर्व विभागाला भेट देवून तेथील यत्रंणेची माहिती घेतली तसेच रुग्णांना अधिकाधिक चांगले उपचार मिळावे यासाठी शासकीय स्तरावर कोणती मदत लागेल याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेतली.यावेळी उपचारासाठी आलेल्या रुग्णांची विचारपूस केली.
तसेच शासनाच्या आगामी काळात सर्व नागरिकांना कोरोणा प्रतिबंधक लसिकरण मोहिमेचा विस्तृत आढावा घेवून ग्रामीण व शहरात हि लसिकरण मोहिम प्रभावीपणे व नियोजित वेळेत कशा प्रकारे यशस्वी करता येईल जिल्हा परिषद ,पंचायत समिती व नगरपरिषदेच्या लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहभाग कोरोणा प्रतिबंधासाठी कसा करता येईल व सर्व नागरिकांना यामध्ये सहभागी करण्याचे नियोजन करण्यासाठी सर्वांशी विचारविनिमय केला.
यावेळी बैठकीस पक्षनेते गुरुदास अभ्यंकर, नगरसेवक विक्रम शिरसट,तम्मा घोडके, डि राज सर्वगोड, नवनाथ रानगट आदी उपस्थित होते.