महाराष्ट्र

निवडणुका असणाऱ्या राज्यांतून येणाऱ्या नागरिकांवर निर्बंध घाला-राज ठाकरे

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत बेसुमार पद्धतीने वाढ होत आहे. (Coronavirus in Maharashtra) मोठ्या प्रमाणात होत असलेल्या रुग्णवाढीमुळे शासन आणि प्रशासन चिंतीत असून, राज्यात होणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या आणि नोकरभरतीच्या परीक्षांबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना फोन केला आहे. (coronavirus: Raj Thackeray calls Uddhav Thackeray regarding MPSC exams, Demand to postpone MPSC exam)
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून एमपीएससीच्या परीक्षेबाबत चर्चा केली. यावेळी राज ठाकरे यांनी वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला, अशी मागणी उद्धव ठाकरेंकडे केली आहे. राज ठाकरेंच्या या मागणीला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात येत आहे. आता एमपीएससीच्या परीक्षेबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राज ठाकरेंसोबत इतर नेत्यांनीही एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तर एप्रिल महिन्यात होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोनाचे ५० हजारहून अधिक रुग्ण सापडत आहेत. गुरुवारी महाराष्ट्रामध्ये ५६ हजार २८६ रुग्णांची नोंद झाली होती. तर दिवसभरात ३७६ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

Related posts