महाराष्ट्र

ग्रामीण जागृकतीतून माती परीक्षणाचे महत्व कु.गवळी

शिरापूर: महात्मा फुले कृषी विद्यापीठ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, रत्नाई कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या ऐश्वर्या हरिदास गवळी शिरापूर शिरपूर (सो) तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. येथे ग्रामीण जागृकती कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन केले असता, या ठिकाणी गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन माती परीक्षण, पाणी परीक्षण, आधुनिक शेती, नैसर्गिक शेती, कमी खर्चात अधिक उत्पादन, शासनाच्या विविध योजना इत्यादी विषय मार्गदर्शन करत आहे.

जुलै 2020 पासून सुरुवात झालेल्या ग्रामीण जनजागृती कार्यक्रमांतर्गत कृषिकन्या ऐश्वर्या हरिदास गवळी हिने प्रत्येक शेतकरी व तसेच गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाऊन आज शासनाने शेतकऱ्यांसाठी देत असलेल्या विविध योजनांचे माहिती देणे व त्याद्वारे शेतकऱ्यानां त्याचे लाभ कसे मिळवता येईल तसेच तंत्रज्ञानाच्या युगात पारंपरिक शेती करण्यापेक्षा तंत्रज्ञान युक्त शेती कसे करावे कमी खर्चात अधिक उत्पन्न कसे घ्यावे माती परीक्षण करणे व त्यानंतर त्याचे महत्त्व पटवून देणे. पाणी परीक्षण करणे व परीक्षणाचे नेमके शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदे होतील याचे महत्त्व पटवून देणे. तसेच शेतकऱ्यांच्या अडीअडचणी विचारून त्यांचे अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणे इत्यादी माध्यमातून शेतकऱ्यांना जनजागृती करण्याचे काम केले.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डी पी कोरटकर ,महाविद्यालयाचे प्राचार्य आर जी नलवडे कार्यक्रम समन्वयक प्रा.एस एम एकतपुरे, कार्यक्रमाधिकारी प्रा.डी एस मिटकरी तसेच विषयतज्ञ म्हणून प्रा एस आर आडत यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रात्यक्षिक सादर करताना परिसरातील शेतकरी उपस्थित कृषीकन्या ऐश्वर्या हरीदास गवळी यांनी मार्गदर्शन केले याचा फायदा गावातील शेतकरी कुटुंबियांना झाल्याने गावात एक प्रकारे आनंदी वातावरण निर्माण झालेला आहे.

Related posts