24.2 C
Solapur
September 26, 2023
महाराष्ट्र

पुण्यात कडक लॉकडाऊन लागणार?

पुण्यासारख्या शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात येत नसेल, तर पुण्यासह अन्य शहरांतही १५ दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा विचार राज्य सरकारने करावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात बैठक सुरू आहे. त्यामुळे पुण्यात लवकरच कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अधिक रुग्णसंख्येच्या शहरांत कडक लॉकडाऊन करा अजित पवार पुण्यात असून ते विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेत आहेत. यावेळी रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पुण्यात लॉकडाउन लावायचा की नाही यावर चर्चा होत आहे.कोरोना मृत्यूचं तांडव! भारतात १० दिवसांत प्रत्येक तासाला १५० रुग्णांचा मृत्यू मुंबई, पुण्यासह राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळेच तो आटोक्यात येत आहे. राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत मुंबई शहरात तो आटोक्यात आणण्यात यश मिळविले आहे. त्यांचा पॅर्टन वापरा. पुण्यासारख्या शहरात तो आटोक्यात येत नसेल, तर पुण्यासह अन्य शहरांतही १५ दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा विचार राज्य सरकारने करावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे.

Related posts