hacklink hack forum hacklink film izle hacklink lunchtime resultsGrandpashabetjojobetgrandpashabethepbet girisjojobetjojobetgrandpashabet
पंढरपूर

राजीव गांधी सायन्स & टेक्नॉलॉजी कमिशनकडून स्वेरीला ४५ लाखांचा संशोधन निधी मंजूर

सचिन झाडे.
पंढरपूर दि.३०

महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी सायन्स & टेक्नॉलॉजी कमिशन (आर.जी.एस.टी.सी.) कडून ४५ लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आल्याची माहिती श्री विठ्ठल एज्युकेशन & रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूरचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली.

येथील श्री विठ्ठल एज्युकेशन & रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर अंतर्गत असलेल्या रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट अर्थात संशोधन विभागामार्फत संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी ‘पायलट प्रोजेक्ट फॉर एक्सप्लोरिंग द अॅप्लिकेशन्स अॅण्ड डेव्हलपिंग बिझनेस मॉडेल्स फॉर युटीलायझेशन ऑफ ड्रोन लाईक मिनी एअर व्हेइकल्स फॉर अॅग्रीकल्चरल अॅप्लिकेशन्स’ या संशोधन प्रकल्पाबाबत प्रस्ताव सादर केलेला होता. त्या प्रस्तावाला तेथील समितीने अभ्यास करून हिरवा कंदील दाखविला असून ४५ लाख रुपये निधी मंजुरीचे पत्र महाविद्यालयास प्राप्त झाले आहे.

भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेतीच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने हा प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे. शेतीतील विविध महत्वपूर्ण कामे जसे ड्रोनच्या सहाय्याने फवारणी करणे, ड्रोनच्या सहाय्याने पिकांच्या वाढीतील व उत्पादन वाढीतील अडचणी शोधणे, किड नियंत्रण करणे, ड्रोनमध्ये बसवलेल्या डीवाईसच्या आवाजाने पक्ष्यांना परतवून लावणे, अवघड ठिकाणी जंगल वाढीसाठी बियाणे विस्कटणे, ड्रोनच्या विविध कामांमधील कार्यक्षमता वाढवणे आदी कामे करता येऊ शकतात.अशा योजनांतर्गत निधी मिळविणारे महाराष्ट्रातील मोजक्या महाविद्यालयांपैकी स्वेरीचे हे महाविद्यालय आहे.

‘स्वेरी’मध्ये संशोधन विभागाची स्वतंत्र निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत जवळपास ७५० लाख (साडेसात कोटी) पेक्षा जास्त निधी मिळाला असून आता यामध्ये या ४५ लाख रुपये निधीची भर पडली आहे. पूर्वी मिळालेल्या सुमारे ७ कोटींच्या निधी मधून महाविद्यालयात विविध संशोधन सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये ५ विशिष्ट संशोधन प्रयोगशाळांचा समावेश आहे. त्याचबरोबर भाभा अणुशक्ती केंद्रासोबत झालेल्या करारातून ग्रामीण मानव संसाधन विकास केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. आता संशोधन निधी मंजूर झालेल्या या प्रकल्पाचे प्रमुख संशोधक म्हणून शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार व स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे हे आहेत तर सहाय्यक म्हणून संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. संतोष साळुंखे, इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलेकम्युनिकेशन इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ.अनुप विभूते आणि सिव्हील इंजिनिअरींगचे डॉ. आर.एस.पवार हे आहेत.

डॉ. प्रशांत पवार यांना भारत सरकारच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून नुकताच ‘विश्वेश्वरय्या बेस्ट टीचर्स अॅवार्ड’ प्रथम क्रमांकाने मिळाला होता.कोरोनाच्या या कठीण काळात मिळालेल्या या संशोधन निधी बाबतच्या यशाबद्दल डॉ. प्रशांत पवार व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांचे संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले आहे.

Related posts