पंढरपूर

निरिक्षक निलीमा केराकट्टा यांची पंढरपूरला मतदान केंद्रास भेट

सचिन झाडे.
पंढरपूर, दि. 30 :

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पंढरपूर तालुक्यातील कासेंगांव मतदान केंद्राची निवडणूक निरिक्षिक निलीमा केराकट्टा यांनी भेट देऊन पाहणी केली.

भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक सूचनांचे पालन करावे. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. मतदान केंद्रावर गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी निवडणुक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे पुरुष मतदार व स्त्री मतदार तसेच दिव्यांग यांच्यासाठी तीन स्वतंत्र रांगा ठेवाव्यात. तसेच दोन मतदारामधील सामाजिक अंतर ठेवावे. त्याचबरोबर वैद्यकीय पथकासाठी साठी स्वतंत्र्य खोलीची व्यवस्था करावी अशा सूचना श्रीमती केराकट्टा यांनी दिल्या.

मतदान केद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व मतदान रांगामधील अंतरासाठी करण्यात आलेली व्यवस्था तसेच कोरोनच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर करण्यात आलेल्या आरोग्य सुविधांची माहिती श्रीमती केराकट्टा यांनी घेतली.

तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील मतदान केंद्राचे निर्जंतुकरण करण्यात आले असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान कर्मचाऱ्यांचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. मतदान केंद्रावर स्वच्छ हात धुण्यासाठी साबण, सॅनिटायझर, फेस मास्क आदी साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. यावेळी तहसिलदार वैशाली वाघमारे, मंडल अधिकारी समिर मुजावर, बाळासाहेब मोरे उपस्थित होते.

Related posts