पंढरपूर

विद्युत पुरवठा खंडीत करण्याची मोहीम तात्काळ थांबवा- आ.प्रशांत परिचारक

सचिन झाडे
पंढरपूर / प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून छोट्या मोठ्या व्यवसायिकांकडून महावितरण प्रशासन थकीत वीज बिलांची सक्तीने वसुली करत आहे. वीज बिल न भरल्यास विद्युत जोडणी तोडली जात आहे. महावितरणाच्या मोहिमेमुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. पिके पाण्यावाचून सुकत आहेत. आधीच कोरोनामुळे गेले दोन वर्ष सामान्य नागरिक, छोटे, मोठे व्यवसायिक प्रचंड अर्थिक अडचणीत आलेले आहेत. त्यामुळे महावितरणने विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहिम तात्काळ थांबवावी अशी मागणी आ.प्रशांत परिचारक यांनी केली आहे.

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील शेतकऱ्यांनी मोटर सायकल रॅली काढत महावितरण कार्यालय गाठले आणि ठीय्या मारून आंदोलन केले. यामुळे काही काळ ठप्प झाली होती. यावेळी शेतकऱ्यांनी महावितरणच्या कारवाईच्या विरोधात आक्रमक भूमिका मांडत आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी कासेगाव परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

पंढरपूर तालुक्यात ऊस, केळी, डांळींब, द्राक्षे, आदी पिकांना पाणी देणे गरजेचे असते मात्र महावितरण कडून थेट कनेक्शन कट केले जात असल्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड अडचणीत सापडला आहे. गेल्या दोन वर्षापासून आर्थिक संकटाचा सामना करताना कसा बसा टिकून राहिलेला शेतकरी महावितरणाच्या या मोहिमेमुळे उध्वस्त होणार आहे. त्यांना गंभीर संकटाचा सामना करावा लागणार आहे. जर तात्काळ ही मोहिम थांबवली नाही तर उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा महावितरणाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आला आहे.

यावेळी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मणराव धनवडे, माजी उपसभापती प्रशांत देशमुख, सुभाष मस्के, विक्रम शिरसट, भास्कर कसगावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ गावंधरे, विजयकाका पंडीतराव देशमुख, प्रकाश बाबर यांच्यासह कासेगाव परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच या आंदोलनाला राजकीय नेत्यांनी सहभाग नोंदवत पाठिंबा दिला.

Related posts