सचिन झाडे –
पंढरपूर-
जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत असलेल्या पंचायत समिती, पंढरपूर आणि श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीमध्ये एकदिवसीय ‘कोरोनामुक्ती अभियाना’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वेरी अंतर्गत असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व कॉलेज ऑफ फार्मसीच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवी मधील सर्व सदस्यांची कोविड -१९ ची तपासणी करण्यात आली…
या कोरोनामुक्त अभियानाचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (आयएएस) यांच्या हस्ते व श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूरचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे , संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे यांच्या उपस्थितीत पार पडले. स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या जवळपास तीनशे स्टाफची कोविड-१९ ची तपासणी करण्यात आली. स्वेरीमध्ये असलेली सुरक्षितता, दोन स्टाफमध्ये सुरक्षित अंतर, मास्क व सेनिटायझर याचा वारंवार वापर व आरोग्याच्या दृष्टीने काटेकोरपणे पालन केले जात असल्याचे दिसून आले.
हे अभियान पंढरपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले व वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. भाऊसाहेब जानकर, डॉ.अभिजीत रेपाळ, डॉ.श्रीकांत नवात्रे, डॉ.प्रभा साखरे, डॉ. अनिसा तांबोळी, डॉ. गुंजाळ, डॉ. शिरीष पाटील, डॉ.बब्रुवान माने, प्रशांत घोडके, तानाजी मल्लाव, राजू सय्यद, दीपक चव्हाण, सरिता राठोड, संगीता जाधव, तालुका अभियान व्यवस्थापक बचत गट विभागाचे सचिन हिरेमठ, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांच्या सह एमआयटी मधील आरोग्य सेवकांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडले.