पंढरपूर – :
पदवीधर, सुशिक्षित बेरोजगार, डॉक्टर, वकील, इंजिनिअर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, हे सर्व गतकाळातील आमचे विद्यार्थीमिञ आहेत. यांना कोणीच वाली उरला नाही यांच्या वरील अन्याला वाचा फोडण्यासाठी तसेच गेल्या वर्षभरात अनेकांना पदवीधरांची मतदार नोंदणी केली या बळावर. सर्व क्षेत्रातील संघटनाना सोबत घेऊन ही निवडणूक लढणार असल्याची माहिती सुभाष मस्के यांनी दिली.
ते पुढे म्हणाले कि मागील कार्यकाळात ज्यांच्या मतांवर आपण निवडून आलो. त्यांच्या अडीअडचणी बद्दल गेल्या अनेक वर्षात एक अवाक्षर बोलले नाही किंवा एकही समस्या सोडवल्याचे ऐकिवात देखील नाही. शिक्षण खात्यातील भोंगळ कारभार तर मागील सरकार च्या काळातील असो की या सरकारच्या काळातील असो आपल्या सर्वांनाच माहिती आहे. या क्षेत्रात तर गेल्या अनेक वर्षांपासून संघटना सर्व स्तरातील घटकांना न्याय मिळवून देण्याचं कामं करत आलो आहे.
कोरोनाकाळात रोजगार थांबले, नोकऱ्या गेल्या,उद्योग धंदे बंद पडले
— कोविड 19 महामारीच्या काळात सर्वच विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं. अनेकांचे रोजगार थांबले, नोकऱ्या गेल्या. उद्योग धंदे बंद पडले, अनेकांचे संसार उध्वस्त झाले, मायबाप सरकार तर सोडाच परंतु हे आमचे पुणे विभागाचे नेते कुठेच दिसलें नाही.
पदवीधरांचा आमदार हा पदवीधर असला पाहिजे कोणी ठेकेदार नाही
काही शिक्षकांनी जगण्यासाठी भाजीपाला विकला, वडापाव च्या गाड्या लावल्या, हातगाड्यावर सानिटायझर विकले, तर काही नी चिप्स बनवले काहींनी खेळणे विकण्याचा धंदा केला , रंगकाम केले कुणी धान्य विक्री केली पेंटिंग करून आपल्या संसाराचा गाडा ओढण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. अनेकांचे हकनाक बळी गेले सरकार कडून साधी मदतीची मागणी ना पदवीधर आमदाराने केली . उद्या येणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी कशी करून घ्यावी याचा अभ्यास हे आमदारांना नाहीत. म्हणून पदवीधरांचा आमदार हा पदवीधर असला पाहिजे कोणी ठेकेदार नाही.
नोकरी नाही म्हणून लग्न जुळत नाहीत
पदवीधराचे हाल सुरू आहेत वकिलांच्या अनेक समस्या आहेत डॉक्टर सुरक्षित नाहीत. त्यांना रोज या ना त्या कारणाने मारहाण केली जाते. इंजिनीयर बेकार फिरताय. बीएड पदवीधर बेकार फिरत आहेत. पुणे विभागातील तरुणांना 35- 35 वर्षे वय झाले तरी त्यांची नोकरी नाही म्हणून लग्न जुळत नाहीत. असे अनेक ज्वलंत प्रश्न असतांना यासंदर्भात गेल्या अनेक वर्षापासून या आमदारांनी एक शब्द देखील काढला नाही. कधी कुणाच्या शाळेवर, एखाद्या कोर्टात किंवा दवाखान्यात जाऊन या त्रासलेल्या शिक्षकाची वकिलाची व डॉक्टरांची साधी विचार पूस केली नाही.
पुणे विभागातील मूळ प्रश्नांना फाट्यावर मारत फक्त पदवीधरांची मत लाटली गेली. म्हणून आता बस्स झालं भूतकाळात आम्ही ज्यांना डॉक्टर वकील इंजिनिअर शिक्षक बनवलं त्या आमच्या माजी विद्यार्थ्यांचे हाल आता पहावत नाही. आणि म्हणूनच आता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना व सर्व सामाजिक संघटनांच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ही निवडणूक सर्व दिशेने ताकदीनिशी लढवणार आहे. .