33.9 C
Solapur
February 21, 2024
अक्कलकोट

ललित नर्सिंग केअरचे मोठ्या थाटात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते उदघाटन

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट येथे सर्व सोयींनीयुक्त असे ललित नर्सिंग केअरचे मोठ्या थाटात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

अक्कलकोट तालुक्यातील गरीब जनतेला कमी खर्चात उपचार व्हावे या उद्देशाने ललित नर्सिंग केयर काढत असल्याचे माहिती डॉ भाग्यश्री मद्री – बनसोडे यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की सर्वसामान्य जनतेला सोलापूर सारख्या ठिकाणी जाऊन उपचार घेणे शक्य नसल्याने अक्कलकोट येथे ललित नर्सिंग केयर सुरू करीत आहोत याठिकाणी महिलांच्या सर्वप्रकारच्या विविध आजारावर उपचार करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे ,उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, डॉ रवींद्र बनसोडे, रिपाइं तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे ,प्रा.राहुल रुही, सिद्धार्थ सोशल फौंडेशन अध्यक्ष कमलाकर सोनकांबळे , भाजपा अनु.जाती तालुकाध्यक्ष निजप्पा गायकवाड, अनुलोमचे राजकुमार झिंगाडे, भाजपा ता.अध्यक्ष मोतीराम राठोड, प्रकाश पाटील, धनंजय गाढवे, गौतम बाळशंकर,अपु पराणे, नागेश होटकर, अमोल पुटगे, माजी नगराध्यक्ष भागेश्री मोरे, गंगाधर मोरे, आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related posts