पंढरपूर

गोपाळपूरच्या ‘स्वेरी’ अभियांत्रिकीच्या १९ विद्यार्थ्यांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये निवड!

आत्तापर्यंत ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ मध्ये तब्बल ३५४ विद्यार्थ्यांची विक्रमी निवड

सचिन झाडे –
पंढरपूरः-

येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ (टीसीएस) या आंतरराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्युवद्वारे शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये १९ विद्यार्थ्यांची निवड झाली असून आत्तापर्यंत टी.सी.एस. मध्ये स्वेरीच्या एकूण ३५४ विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय कंपनी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ ने टीसीएस निंजा एन.क्यू.टी (नॅशनल कॉलीफायर टेस्ट) या देशपातळीवरील ऑनलाईन अॅप्टिट्यूड टेस्टद्वारे आणि त्या नंतरच्या मुलाखत प्रक्रियेद्वारे स्वेरीच्या तब्बल १९ विद्यार्थ्यांची निवड केली. मुलाखतीतून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक अभ्यासाबरोबरच कमालीची शिस्त, आदरयुक्त संबंध व उत्कृष्ट शिक्षण पध्दती यामुळे निवड समिती अत्यंत प्रभावित झाली.

या निवड प्रक्रियेतून सायली शंकर भोसले, शुभम सतिश शिरूर, काजल पितांबर कुंभार, भारत कुबेर सुतार, वैभव श्रीनिवास खबानी, श्रीहरी कुबेर जाधव, प्रदीप गणेश माळी, रोहन सत्यनारायण करणकोट, रुपाली विलास गुरव, प्रिती विजय भोसले, गायत्री सोमनाथ ठाकरे, पांडुरंग धोंडीराम मिसाळ, श्रृती अनिल पाटील, श्रीनाथ जयंत देशमुख, चैतन्य मुकुंद कावळे, ऋषिकेश मनोज भागवत, ओंकार शशिकांत भोसले, सिद्धेश्वर सुभाष गायकवाड व विशाल जनरथ कदम असे मिळून स्वेरीच्या एकूण १९ विद्यार्थ्यांची निवड टी.सी.एस कंपनीत करण्यात आली. या कंपनीत गतवर्षी पर्यंत स्वेरीच्या ३३६ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली होती. त्यात आता या नवीन १९ विद्यार्थ्यांची भर पडली असून टी.सी.एस. कंपनीत आता विक्रमी ३५४ जणांची वर्णी लागली आहे. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीची संधी उपलब्ध झाल्याने विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. एकूणच स्वेरीत मिळणाऱ्या संस्कारामुळे विद्यार्थी प्रगतीच्या दिशेने झेपावत आहेत.

सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे प्रा. आशीष जाधव आणि प्रा. अविनाश मोटे यांच्या नेतृत्वाखाली विभागप्रमुख आदी प्राध्यापकांचे बहूमोल मार्गदर्शन लाभले असून संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Related posts