कॉंग्रेसचे भागवत धस यांच्या समोर शेकापचे सुखदेव टेकाळे यांचे कडवे आव्हान !!
जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
कळंब – तालुक्यात ५९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तरुणाईच्या उत्साहाने निवडणूकीला तिरंगी आणि दुरंगी रंग चढला आहे. विधानसभेसह जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकीत बाहेर गावचे मतदार आणून मतदान करून घेतले जात होते. मात्र यंदा कोरोना काळात बाहेर गावच्या मतदारांना दिलेली वागणूक गाव पुढाऱ्यांच्या अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता आहे. तालुक्यातील ५९ ग्रामपंचायती पैकी भाटशिरपुरा ,वाकडी,आडसूळवाडी, लासरा,दुधाळवाडी,हळदगाव या सहा ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत.
कळंब शहरापासून ७ कि.मी अंतरावर असलेल्या पिंपळगाव (डोळा) येथे एकूण तीन वॉर्डातून ९ जागेसाठी २३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.वार्ड क्रमांक १ मध्ये एस.सी च्या एका जागेसाठी सा.साक्षी पावनज्योतचे संपादक सुभाष घोडके यांच्या विरोधात श्रीरंग घोडके,राजकुमार घोडके हे उभे आहेत.तर ओबीसी महिलेच्या एका जागेसाठी विद्यमान सदस्य गुरुलिंग स्वामी यांच्या पत्नी संगीता स्वामी यांच्या विरोधात कलावती घोटकर आहेत. तर सर्वसाधारण महिलेच्या एका जागेसाठी रेशन दुकानदार तथा मनसे कार्यकर्ते अशोक दशवंत यांच्या पत्नी पूनम दशवंत यांच्या विरोधात लताबाई कोरडे,जयश्री टेकाळे आहेत. वार्ड क्रमांक.२ मध्ये सर्वसाधारण महिलेच्या एका जागेसाठी विद्यमान सदस्य पांडूरंग दत्त यांच्या पत्नी मनीषा दत्त यांच्या विरोधात प्रतिभा जमाले आहेत.ओबीसी पुरुष एका जागेसाठी राजेंद्र काळे यांच्या विरोधात रामलिंग पांचाळ,अंकुश पांचाळ आहेत.सर्वसाधारण पुरुषाच्या एका जागेसाठी विद्यमान उपसरपंच उमेश धस यांच्याविरोधात माजी सरपंच तथा शेकापचे निष्ठावंत कार्यकर्ते सुखदेव टेकाळे,श्रीकांत टेकाळे आहेत.
वार्ड क्रमांक ३ मध्ये सर्वसाधारण महिलेच्या एका जागेसाठी विद्यमान सदस्य शाहू बारगुले यांच्या पत्नी कौशल्या बारगुले यांच्या विरोधात भारती गायकवाड, सर्वसाधारण महिलेच्या दुसऱ्या जागेसाठी माजी सरपंच कल्याण टेकाळे यांच्या पत्नी रत्नमाला टेकाळे यांच्या विरोधात उषा सोमासे आहेत तर सर्वसाधारण पुरुषाच्या एका जागेसाठी भाजपाचे सुंदर टेकाळे यांच्या विरोधात सेना कार्यकर्ते तथा उद्योजक नवनाथ जगताप,सुजित टेकाळे आहेत.
काँग्रेसचे दिग्गज नेते भागवत धस यांच्यासमोर शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुखदेव टेकाळे यांचे कडवे आव्हान असले तरी कोण बाजी मारणार हे १५ तारखेनंतरच कळणार !