33.9 C
Solapur
February 21, 2024
पंढरपूर

पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी यांना दिवाळी ऍडव्हान्स, सातवा वेतन आयोगाचा फरक व प्रोत्साहन भत्ता म्हणून अकरा हजार रुपये दिवाळीपूर्वी मिळणार,

पंढरपूर –
पंढरपूर नगर परिषद कामगार संघटना व अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटना यांनी पंढरपूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळावे, सातव्या वेतनाचा फरकाची रक्कम मिळावी व दिवाळी ॲडव्हान्स मिळावा,सानुग्रह अनुदान मिळावे व इतर विविध मागण्यांबाबत दिवाळी पूर्वी आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती.

यावर आमदार प्रशांतराव परिचारक, नगराध्यक्ष सौ साधनाताई नागेश भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट,पक्षनेते व उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव,गुरुदास अभ्यंकर, नगरसेवक राजू सर्वगोड, विक्रम शिरसट,संजय निंबाळकर, कृष्णा वाघमारे, माजी नगरसेवक निलराज डोंबे, यांच्यासमवेत कामगार नेते सुनील वाळुजकर नानासाहेब वाघमारे ,शरद वाघमारे ,नागन्नाथ गदवालकर, गुरू दोडिया यांच्या शिष्टमंडळा बरोबर चर्चा झाली आहे त्यानुसार आमदार प्रशांतराव परिचारक व पदाधिकारी यांनी नगरपरिषद कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचा फरकापोटी रु 5000 , दिवाळी ऍडव्हान्स रु 5000 व प्रोत्साहन भत्ता रु 1000 असे रु अकरा हजार रुपये दिवाळीपूर्वी देण्याचे मान्य केले यावेळी कामगार संघटनेचे पदाधिकारी संतोष सर्वगोड,जयंत पवार, किशोर खिल्लारे, अनिल गोयल, धनंजय वाघमारे, महावीर कांबळे,प्रीतम येळे
तानाजी अधटराव,सुखदेव माने,पोपट जाधव,संजय माने,चिदानंद सर्वगोड,गणेश धारूरकर,पराग डोंगरे हे उपस्थित होते.

Related posts