सचिन झाडे
पंढरपूर प्रतिनिधी
– जिल्ह्यासह शहरी व ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाच्याआरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांमध्ये आरोग्य साक्षरता निर्माण व्हावी यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ या मोहिमेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे, आवाहन मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी केले आहे.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ या मोहिमेचा शुभारंभ माळी वस्ती, टाकळी रोड पंढरपूर येथे नगराध्यक्षा साधना भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, नगरसेवक श्री.घोडके, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुंजकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, डॉ.सरवदे, डॉ.धोत्रे तसेच आरोग्य पथकाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मुख्याधिकारी मानोरकर म्हणाले, या मोहिम कालावधीत गृह भेटी देण्यासाठी आरोग्य पथके तयार करण्यात आली असून या पथकाकडून घरोघरी जावून कुटुंबांतील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य विषयक माहिती संकलित करुन आजारी तसेच आजाराची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना तात्काळ वैद्यकीय उपचार करण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक वार्डात पथकाव्दारे 50 कुंटूबांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी आरोग्य पथकाला आरोग्य विषयक तपासणी व आजारासंबधी माहिती याबाबत सहकार्य करावे असे, आवाहन ही श्री मानोरकर यांनी केले आहे.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ या मोहिमेत या मोहिमेत कुटंबातील कोणताही नागरिक आरोग्य तपासणी पासूण वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन नगराध्यक्षा साधना भोसले यांनी केले यांनी यावेळी केले आहे.
तुंगत येथे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’या मोहिमेचा शुभारंभ
ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जबादारीची जाणीव निर्माण व्हावी, आरोग्य साक्षरता निर्माण व्हावी या उद्देशाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचा शुभारंभ प्राथमिक आरोग्य केंद्र, तुंगत ता.पंढरपूर येथे करण्यात .
यावेळी गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, सरपंच अंतनराव रणदिवे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री .पिसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, ग्रामपंचायत सदस्य , आरोग्य अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर उपस्थित होते
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियाना अंतर्गत घरोघरी तपासणी करण्यात येणार असल्यामुळे कोरोना बधितांना वेळेत उपचार मिळवून देणे शक्य होईल. यासाठी ग्रामीण भागात आरोग्य पथके तयार करण्यात आली असून, गावांतील 50 कुटुंबांची आरोग्य तपासणी व आरोग्याबाबत माहिती संकलित करण्यात येणार आहे. तसेच जनजागृती करण्यात येणार आहे. आजाराची लक्षणे असणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ उपचार करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी सांगितले.