मराठा महासंघाच्या वतीने सरकारच्या आदेशाची केली होळी
पंढरपूर(प्रतिनिधी):-
मराठा समाज आणि सरकार यांच्या मध्ये संघर्षाची ठिणगी पडली असून सरकारच्या निषेधार्थ पंढरपूर येथे मराठा महासंघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार च्या आदेशाची मराठा महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी होळी केली.
कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने फक्त मराठा समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी या महामंडळाची स्थापना केली होती . पण १९९८ पासून साधारण २०१४ पर्यंत साधारण अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हे सर्व साधारण तरुण मराठा मुलांना माहिती पण नव्हते सरकारने २०१६ च्या नंतर कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव आमदार नरेंद्र पाटील यांना महामंडळाचे अध्यक्ष केले . आणि चमत्कार झाला आपल्या वडीलांच्या नावाने असणाऱ्या महामंडळाचा माझ्या सर्व सामान्य मराठा तरुणांना उद्योजक करण्यासाठी फायदा व्हावा त्यांना आर्थिक निधी मिळावा म्हणून आमदार नरेंद्र पाटील यांनी पायाला भिंगरी बांधून संबंध महाराष्ट्र पिंजून काढला आणि महामंडळाने पण कात टाकली हजारोंच्या संख्येने मराठा तरुणांना बँकेच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा लाभ मिळाला २०१९ रोजी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले त्यांनी पण आमदार नरेंद्र पाटील यांनी अध्यक्ष म्हणून काम करण्यास परवानगी दिली आणि संधी दिली पण अचानक मराठा आरक्षणावर स्थगिती आली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून देशात सर्व प्रथम ज्यांनी मराठा आरक्षणासाठी आत्मबलिदान दिले कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांचे वारसदार शांत कसे बसतील, आमदार नरेंद्र पाटील यांनी आपल्या राजकीय नफा तोटा यांचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता निस्वार्थ पणे मराठा आरक्षणाचा मुद्दा अगदी प्रखरपणे मांडायला सुरूवात केली, आंदोलन, पत्रकार परिषद, मेळावा , विविध जिल्ह्यातील बैठकांना हजेरी त्यातुनच सरकार वर नरेंद्र पाटील यांनी खुलेपणाने टिका केली कारण सर्व परिस्थिती मराठा समाजाच्या विरोधात जात होती. कालच्या नांदेड येथील मराठा संघटनेच्या व्यासपीठावरून त्यांनी सरकार आणि अशोक चव्हाण यांना चांगलेच फैलावर घेतले. मराठा विरोधी अशोक चव्हाण यांनी आपले राजकीय ताकद वापरून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त करायला भाग पाडले अशोक चव्हाण सर्व सामान्य मराठा तरुण तुम्हाला याचा जाब विचारणार आहे. नरेंद्र पाटील यांना परत महामंडळाच्या अध्यक्षस्थानी सन्मानाने नियुक्त करावे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवावा नाहीतर मराठा समाज आणि सरकार यांच्या मध्ये संघर्ष हा निश्चित आहे.
त्यांच्या निषेधार्थ पंढरपूर येथे मराठा महासंघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार च्या आदेशाची होळी केली. सोलापूर जिल्हाअध्यक्ष अर्जुनराव चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष सचिन गंगथडे, तालुकाध्यक्ष संतोष जाधव, शहराध्यक्ष अमोल पवार, शहर संघटक काका यादव, रिक्षा संघटनां शहर अध्यक्ष नागेश गायकवाड, विद्यार्थी अध्यक्ष प्रणव गायकवाड ,जिवन गायकवाड, महेश बिस्किटे ,अनिकेत काळे, पांडुरंग शिंदे, महेश बोडके, गणेश काळे सह मरठा महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.