29.7 C
Solapur
September 29, 2023
पंढरपूर

स्वेरी डिप्लोमाच्या ओम हरवाळकर यांचे इथिकल हॅकिंग स्पर्धेत टॉप टेन मध्ये यश

पंढरपूर –
‘विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच इतर उपक्रमात नेहमीच प्रोत्साहन देण्याचं काम स्वेरी करत असते. याचीच प्रचिती म्हणून डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या द्वितीय वर्षात शिकत असणाऱ्या ओम जगन्नाथ हरवाळकर यांनी इथिकल हॅकिंग स्पर्धेमध्ये टॉप टेन मध्ये नववा क्रमांक मिळवला.’ अशी माहिती, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी दिली.

‘ऑर्गनायझेशन अँड मास्टर इन इथिकल हॅकिंग’ आयोजित या ऑनलाईन स्पर्धेमध्ये जगातून जवळपास आठ कोटी तर भारतातील पाच लाख स्पर्धकांनी ते ही सर्व वयोगटातील विद्यार्थी व प्राध्यापक स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. या मधून पहिल्या १० स्पर्धकांमधून ओम याची नवव्या क्रमांकावर निवड झाली. ही स्पर्धा सलग ९६ तासाची होती त्यातून ओम ला एक तास पंचावन्न मिनिटे लागली. या स्पर्धेमध्ये दिलेल्या आकृती मधून गूढ शब्द शोधून काढणे, तसेच विविध संगणक हॅक करणे, डी कोड सेंड करून इथिकल हॅकींग करणे असे विविध टास्क देण्यात आले होते. या मधून ज्यांनी कमी वेळेत हे टास्क पूर्ण केले अशा ५० स्पर्धकांची निवड करण्यात आली. दोन महिन्यापूर्वी झालेल्या स्पर्धेत ओम ने ३४ वा क्रमांक मिळविला होता. आयटी या क्षेत्रात आता इथिकल हॅकिंगचे क्षेत्रही मोठं होत आहे. याचा वापर सायबर सेक्युरिटी आणि पोलीस विभागात होतो. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सिक्युरिटी, आयटी सेल मध्ये नोकरीची संधी उपलब्ध होत आहे. ओम हरवाळकर यांनी मिळवलेलं हे यश कौतुकास्पद आहे. या यशामुळे संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांनी ओम यांची पाठ थोपटली. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख प्रा.अवधूत भिसे व कॉम्प्युटर इंजिनिअरींगचे विभागप्रमुख प्रा. अमेय भातलवंडे यांचे ओम ला मार्गदर्शन लाभले. यावेळी ओम हरवाळकर याचा सत्कार आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या सिनेट सदस्या पी.आर. नागणसुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्हीव्हीपी महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरींगच्या प्रा.डॉ. आर.एस. सज्जन, ओम चे वडील जगन्नाथ हरवाळकर हे देखील उपस्थित होते. या यशाबद्दल स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी. पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले, संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम.पवार,डिप्लोमाचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी ओमचे अभिनंदन केले.

छायाचित्र- इथिकल हॅकिंग स्पर्धेत स्वेरीच्या डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या ओम हरवाळकर यांनी यश मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या सिनेट सदस्या पी.आर. नागणसुरे सोबत डावीकडून जगन्नाथ हरवाळकर, व्हीव्हीपी महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरींगच्या डॉ. आर.एस. सज्जन, डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ व स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी. पी. रोंगे उपस्थित होते.

Related posts